शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२०२४ चा शेवटचा आठवडा: ५ राशींना अत्यंत शुभ, उन्नती-प्रगती-फलदायी; नववर्षांत इच्छापूर्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 07:07 IST

1 / 15
सन २०२४ ची सांगता होण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. नववर्षाची सर्वांना आस लागलेली आहे. सन २०२४ हे वर्ष कसे गेले, याचा आढावा घेण्याची सुरुवात अनेकांनी केली आहे. तर नवीन वर्षांत काय करता येऊ शकेल, याचे संकल्प केले जात आहेत. अशातच डिसेंबर महिन्याचा किंबहुना २०२४ चा शेवटचा आठवडा अनेकांसाठी अतिशय खास ठरू शकतो, असे सांगितले जात आहे.
2 / 15
सन २०२४ च्या सांगतेला शुक्र राशीपरिवर्तन करत आहे. शनिवार, २८ डिसेंबर रोजी शुक्र मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करत आहे. विशेष म्हणजे डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच शुक्र मकर राशीत विराजमान झाला होता. आता शुक्र कुंभ राशीत प्रवेश करत आहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे मकर आणि कुंभ या दोन्ही शनीचे स्वामित्व असलेल्या राशी आहेत.
3 / 15
सन २०२४ हे वर्ष संपताना ग्रहस्थिती अशी आहे की, हर्षल मेष राशीत, गुरु वृषभ राशीत, मंगळ कर्क राशीत, केतु कन्या राशीत, बुध वृश्चिक राशीत, सूर्य धनू राशीत, प्लूटो मकर राशीत, शुक्र कुंभ राशीत जाईल. तेथे त्याची युती शनीशी होईल. राहु आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? जाणून घेऊया...
4 / 15
मेष: आगामी काळ उन्नतीदायक व लाभदायक असू शकतो. कार्यात यशस्वी होण्यासाठी मोठ्या अडथळ्यांचा व आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. परंतु समर्पणाने व प्रतिबद्धतेने त्यात यशस्वी होऊ शकता. धीर धरावा लागेल. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी परिस्थितीचा अंदाज घ्यावयास हवा. असमंजस स्थितीत घाई करू नये. हळूहळू व सामंजस्याने त्यात पुढील वाटचाल करावी. आहार-विहारावर लक्ष ठेवावे लागेल. एखाद्या नवीन तंत्राचा किंवा उपायांचा वापर करू शकता. मन प्रसन्न राहील. कुटुंबियांची मदत समर्थन प्रदान करेल. कार्यक्षेत्री काही काळासाठी थोडा संघर्ष होऊ शकतो, परंतु त्यानंतर कार्यसंपन्न होण्याची संभावना आहे.
5 / 15
वृषभ: विविध आव्हानांचा सामना करावा लागण्याची संभावना असल्याने धैर्य व चोख व्यवहार करण्याची आवश्यकता आहे. क्रोध व आवेशावर नियंत्रण येण्यासाठी मन ताब्यात ठेवा. संवाद साधताना सतर्क राहा. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची संभावना असल्याने संपत्तीत वाढ होईल. व्यवसायात संघर्षानंतरच लाभ प्राप्त होऊ शकतो. नवीन गुंतवणूक करण्याची किंवा व्यावसायिक संबंध जोडण्याची संधी मिळू शकते. परीक्षा व स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळण्याची संभावना असून ती उत्तरार्धापर्यंत समोर येऊ शकते. विद्यार्थ्यांनी अध्ययनाकडे विशेष लक्ष देऊन व मेहनतीने अभ्यास करावा. मुलांना एखादे मोठे यश मिळण्याची संभावना आहे. मान-सन्मानात वाढ होईल.
6 / 15
मिथुन: काही अडचणी व आव्हाने घेऊन आगामी काळ येत आहे. कार्यक्षेत्री थकवा व कामाचा भार असल्याचे जाणवू लागल्याने मन बेचैन होऊन काम करण्यास त्रास होऊ शकतो. लक्ष्यांक गाठण्यास त्रास होऊ शकतो. आर्थिक समस्यांचे निराकरण करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. जमीन, घर किंवा वाहन ह्यांच्या खरेदी - विक्रीस थोडा विलंब होऊ शकतो. आहारावर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. पौष्टिक आहार घेण्याची व व्यायाम करण्याची गरज आहे. वैवाहिक जीवनातील सामंजस्य व प्रेम टिकून राहील. मुलांप्रती सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आव्हानांना सामोरे जाताना डोके शांत ठेवण्याची व समस्यांचे निराकरण करताना सक्रिय राहण्याची गरज आहे.
7 / 15
कर्क: विशेष लक्ष द्यावे लागेल. कामात विघ्न आणणाऱ्या व्यक्तींपासून अंतर ठेवावे लागेल. जेणेकरून कार्यक्षेत्री कामे निर्विघ्नपणे पार पडू शकतील. कामानिमित्त प्रवासाचे आयोजन संभवते. तेव्हा त्यासाठी सावध राहावे. कोणत्याही प्रकारे गैरसमज होऊन समाजात बदनामी होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. वैवाहिक जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. सामंजस्य निर्माण करून कार्यक्षेत्री होत असलेल्या त्रासांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करावा. उत्तम असा संघर्ष करून व सावधपणे पाऊल उचलून लक्ष्यांक गाठण्यात यशस्वी होऊ शकाल.
8 / 15
सिंह: आगामी कालावधी शुभता व सौभाग्य घेऊन येत आहे. युवकांची संगीत, कला, नृत्य इत्यादीतील गोडी वाढेल. बराचसा वेळ मित्रांसह मौज-मजा करण्यात घालवाल. जमीन, घर किंवा वाहन इत्यादींच्या खरेदी-विक्रीची मनोकामना पूर्ण होऊ शकेल. माता-पित्यांकडून स्नेह व सहकार्य प्राप्त होईल. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. दांपत्य जीवन सुखद होईल. वैवाहिक जोडीदारासह एखाद्या सहलीच्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकाल. परीक्षा-स्पर्धेची तयारी करणाऱ्यांसाठी काळ भाग्यशाली ठरेल. एखादी चांगली बातमी ऐकिवात येण्याची संभावना आहे. मुलांचे सहकार्य प्राप्त होईल.
9 / 15
कन्या: काळ काहीसा धावपळीचा आहे. कामानिमित्त जवळचे किंवा लांबचे प्रवास करावे लागू शकतात. आर्थिक बाबतीत योजनाबद्ध कार्य करणे लाभदायी होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येण्याची संभावना असल्याने त्यांना त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. वैवाहिक जीवनात प्रेमळ वाद झाले तरी दांपत्य जीवनातील माधुर्य टिकून राहील. आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. व्यापारात अपेक्षित लाभ न झाल्याने मन हताश होऊ शकते. परंतु सकारात्मक चिंतन करूनच उन्नती व प्रगती होत असते ह्याची जाणीव ठेवावी लागेल. सतर्क राहून व समर्थनाने समस्यांचा सामना केल्यास यशस्वी व्हाल.
10 / 15
तूळ: कालावधी काही समस्या घेऊन येऊ शकतो. परंतु धैर्य व समर्थनासह त्यांचा सामना करू शकाल. कामात थोडा त्रास होऊ शकतो, परंतु तो दीर्घकाळ होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. धीर धरून व कुटुंबियांच्या सहकार्याने त्यातून बाहेर पडावे. कालांतराने गोष्टी बाजूने परावर्तित होण्याचे संकेत आहेत. त्यात समर्थन व मदत मिळू लागेल. धीर धरा व मोठा निर्णय घेण्यासाठी कुटुंबियांशी चर्चा करून सहमती मिळवा. एखाद्या धार्मिक ठिकाणचा प्रवास होण्याची संभावना आहे. हा प्रवास आत्म्यास शांती व सकारात्मकता प्रदान करू शकेल. प्रेम संबंधातील प्रगल्भता व प्रेमिकेशी उत्तम समन्वय, ह्या दोन कारणाने आपले प्रेम संबंध दृढ होऊन आनंदित व्हाल. व्यापारात यशस्वी व्हाल. तसेच व्यापारवृद्धी करण्यात यशस्वी व्हाल.
11 / 15
वृश्चिक: मिश्र फलदायी काळ आहे. परीक्षेची-स्पर्धेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. गुप्त शत्रूंपासून सावध राहावे लागेल. तेव्हा सतर्क राहा. कार्यक्षेत्री योजनेची माहिती कोणालाही न देण्याचा सल्ला देण्यात येत आहे. विरोधकांच्या हाती लागली तर ते नुकसान करण्याची संभावना आहे. व्यवसायानिमित्त प्रवास करावे लागतील. आर्थिक देवाण-घेवाण करताना सावध राहावे लागेल. वैवाहिक जीवन सुखद होईल. संबंधातील माधुर्य टिकून राहील. जोडीदार पाठीशी ठामपणे उभा राहील. कामे सावधपणे संपन्न करा. जबाबदारी लक्षपूर्वक पार पाडा. अनुकूलता प्रदान करणारा आहे. विभिन्न क्षेत्रात यशस्वी व्हाल. पाऊल समृद्धीच्या दिशेने पडेल. उद्योग - व्यवसायाची वृद्धी होईल.
12 / 15
धनु: शुभ फलदायी काळ होऊ शकतो. प्रवास सुखद व मनोरंजक होतील. कुटुंबियांसह सहलीस जाण्याची संधी मिळेल. कारकिर्दी व व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत शुभ आहे. अपेक्षित पद मिळू शकते. तसेच एखाद्या उपलब्धीसाठी सन्मानित केले जाऊ शकते. प्रतिष्ठा उंचावेल. मुलांकडून खुशखबर ऐकण्याची संधी मिळू शकते. स्वकीयांशी झालेले गैरसमज दूर होऊन आत्मीय प्रेमात वाढ होईल. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. दांपत्य जीवन सुखद होईल. प्रियजनांच्या सहवासात आनंददायी व सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. जीवनात अनेक चांगल्या बातम्या ऐकू शकाल.
13 / 15
मकर: ध्येयावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. समस्यांचे शांत मनाने निराकरण करण्यासाठी धैर्याने व संयमाने कामे करावी लागतील. प्रेम संबंधांचे प्रदर्शन सामाजिक माध्यमांवर नाही केले तर निष्कारण त्रासापासून दूर राहण्यास मदत होईल. व्यावसायिक दृष्टिकोनातून आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञ व्यक्तीचा किंवा हितचिंतकांचा सल्ला घेणे उचित ठरेल. वैवाहिक जीवन सुखद होणार असले तरी पत्नीशी समन्वय साधणे काहीसे अवघड होऊ शकते. जोडीदाराचे समर्थन मिळत राहील. परदेशात जाऊन स्थायी होण्याची किंवा रोजगारासाठी प्रयत्न करण्याची योजना असल्यास थोडी वाट पाहावी लागू शकते. परंतु प्रयत्न यशस्वी होतील. संबंध जपण्यावर व ध्येयावर विशेष लक्ष दिल्यास चांगले परिणाम मिळतील.
14 / 15
कुंभ: व्यवसायासाठी व कारकिर्दीसाठी शुभ व लाभदायी काळ आहे. व्यावसायिक क्षेत्रात केलेले प्रवास सुखद व फलदायी होतील. वरिष्ठांचे व कनिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. जीवनात प्रगती करण्याची चांगली संधी मिळू शकते. प्राप्तीसाठी अतिरिक्त स्रोत मिळू शकतात. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीची झालेली भेट भविष्यात मोठ्या लाभास कारणीभूत होऊ शकते. जमीन-घर खरेदी-विक्रीसाठी आई-वडिलांचे समर्थन व सहकार्य लाभेल. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्थिर होऊ शकाल. प्रेमीजनांसाठी शुभ फलदायी काळ आहे. स्पर्धेची तयारी करत असाल तर त्यासाठी काळ अनुकूल आहे. मेहनत व अध्ययन यावर लक्ष केंद्रित करावे. यशस्वी होण्याची संधी आहे. एकंदरीत यश, समृद्धी, प्रेम व आरोग्यासाठी शुभ व लाभदायी होणारा काळ आहे.
15 / 15
मीन: आगामी काळ अत्यंत शुभ फलदायी असून तो यश व आनंद घेऊन येणारा आहे. जीवनात नवीन व सुखद संधी मिळणार आहे. लाभ घ्यावयाचा आहे. रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. परदेशात उच्च शिक्षणासाठी किंवा कामासाठी जाण्याचा विचार करत असाल तर त्यात यश मिळू शकेल. प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षणांचा आनंद घेऊ शकाल. वैवाहिक जीवन सुखद होईल. जमीन-घर किंवा पैतृक संपत्तीशी संबंधित विवादांचे निराकरण होईल. विजयी व्हाल. व्यवसायात अपेक्षित लाभ मिळून प्रगती होईल. मेहनतीचे फळ मिळेल. व्यवसायात व कारकिर्दीत प्रगती होईल. एकंदरीत हा आठवडा यशाचा, सुखाचा व प्रगतीचा आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यWeekly Horoscopeसाप्ताहिक राशीभविष्यspiritualअध्यात्मिक