२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 08:55 IST
1 / 9Surya Chandra Rare Auspicious Yoga October 2025: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या गोचराने अनेक शुभ योग, राजयोग जुळून येत असतात. नवग्रहांमध्ये सूर्य आणि चंद्र यांना विशेष महत्त्व आहे. सूर्य आणि चंद्राचे कुंडलीतील स्थान, गोचर याचा मोठा प्रभाव एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर पडू शकतो असे मानले जाते.2 / 9१० ऑक्टोबर रोजी चंद्र वृषभ राशीत प्रवेश करेल. तर, रात्री सूर्य चित्रा नक्षत्रात प्रवेश करेल. सूर्य ऊर्जा, आत्मविश्वास, नेतृत्व, आरोग्य आणि सन्मानाचा कारक मानला जातो. दुसरीकडे, चंद्र मन, आनंद, मानसिक शांतता, वाणीचे प्रतिनिधित्व करतो. या दोन्ही ग्रहांचे भ्रमण काही राशींच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकते.3 / 9आताच्या घडीला सूर्य बुधाचे स्वामित्व असलेल्या कन्या राशीत विराजमान आहे. तर चंद्र वृषभ राशीत प्रवेश करत आहे. वृषभ ही चंद्राची उच्च रास आहे. त्यामुळे चंद्राचे या राशीतील गोचर अनेकार्थाने शुभ मानले जात आहे. पुढील काही दिवस चंद्र याच राशीत असेल. कोणत्या राशी लकी ठरतील, लगतच्या काळात कसा प्रभाव असेल, ते जाणून घेऊया...4 / 9वृषभ: अत्यंत शुभ काळ ठरू शकतो. कुटुंबाकडून पाठिंबा मिळू शकतो. ते नवीन उपक्रम सुरू करू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदी करण्यासाठी, महत्त्वाचे व्यवहार अंतिम करण्यासाठी हा एक शुभ काळ असू शकतो. सुख, सोयी आणि सुविधा वाढतील. आत्मविश्वास वाढेल. आदर आणि सन्मान मिळेल. व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा खूप शुभ काळ असेल.5 / 9कर्क: हा काळ आनंददायी राहू शकेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांना कामात मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. कौटुंबिक संबंध अधिक सुसंवादी होतील. मुलांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. सोने खरेदी करण्याचीही शक्यता आहे.6 / 9सिंह: चंद्र आणि सूर्य गोचर शुभ ठरू शकेल. या काळात कामात आणि व्यवसायात प्रगती अनुभवता येईल. बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते. वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ अनुभवता येतील. व्यावसायिकांना लक्षणीय आर्थिक लाभ अनुभवता येतील. त्यांचा व्यवसाय विस्तारू शकेल.7 / 9कन्या: चंद्र आणि सूर्याचे गोचर फायदेशीर ठरू शकेल. या काळात नशीबाची साथ मिळेल. जीवनातील नकारात्मक प्रभाव दूर होतील. चांगला काळ सुरू होईल. भविष्यासाठी पैसे वाचवता येतील. शिक्षणातही यश मिळेल. नोकरीत पदोन्नती मिळू शकेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन उत्तम राहील. जोडीदाराचीही प्रगती होऊ शकते. देशात किंवा परदेशात प्रवास करू शकता.8 / 9तूळ: हा कालावधी अतिशय शुभ ठरू शकतो. जमिनीशी संबंधित बाबींमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास नफा मिळू शकतो. व्यावसायिकांना त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. नुकतेच लग्न झालेल्यांचे नाते अधिक गोड होईल. आईशी असलेले ऋणानुबंध अधिक घट्ट होऊ शकतील. घरात आनंदी वातावरण निर्माण होईल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा काळ अनुकूल राहण्याची शक्यता आहे.9 / 9- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.