शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

१६ वर्ष असते महादशा, ३ राशींना ठरते शुभ; गुरु मोठे बदल तर करतोच, सुख-समृद्धी-भरभराटही देतो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 06:03 IST

1 / 15
16 Years Guru Mahadasha: देवानांच ऋषीणांच गुरुं कान्चनसन्निभम। बुद्धि भूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पितम्॥, भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. गुरूची महती सांगावी तेवढी कमीच आहे. ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला अतिशय महत्त्व असून वरचे स्थान आहे. आयुष्यात चांगला गुरू मिळणे भाग्याचे लक्षण समजले जाते. तसेच कुंडलीत गुरू ग्रहाची स्थिती उत्तम असणे हेही भाग्योदयाचे लक्षण मानले जाते.
2 / 15
Guru Mahadasha Impact And Effect: गुरु हा सूर्यमालेतील सूर्यापासून पाचवा ग्रह आहे. सर्व ग्रह एकत्र केले तरी याचा आकार त्यांच्यापेक्षा अडीच पट मोठा आहे. सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्याचा त्याचा काल सुमारे १२ वर्षे आहे. साधारणपणे गुरु ग्रह एका राशीतून एक वर्ष ते तेरा महिने इतक्या कालावधीत भ्रमण करतो. गुरु हा ज्ञान, सुखकारक आहे. गुरु हा आकाशतत्वाचा ग्रह आहे.
3 / 15
Guru Mahadasha In Kundali: गुरु हा देवांचा गुरु मानला जातो. गुरु हा सत्वगुणी ग्रह आहे. अंकशास्त्रात मूलांक ३ चा स्वामी गुरु आहे. कर्क ही गुरुची उच्च रास आहे. म्हणजेच या राशीत गुरु सर्वाधिक, सर्वोत्तम फले देऊ शकतो. तर, मकर रास गुरुची नीच रास होय. या राशीत गुरु कमी फले देऊ शकतो, असे म्हटले जाते.
4 / 15
गुरु हा आपल्या स्पर्शाने अथवा दृष्टीने मातीचे सोने करण्याची क्षमता असलेला ग्रह आहे. गुरुप्रधान व्यक्ती शिक्षक, प्रोफेसर, सरकारी कार्यालयातील कर्मचारी, भिक्षुक, गुरू, धार्मिक कार्ये करणारे पुरोहित, कीर्तनकार, प्रवचनकार, बँक कर्मचारी, राजकीय सल्लागार, सामाजिक पुढारी, ज्योतिषी, न्यायाधीश, हिशोबनीस असू शकतात, असे मानले जाते.
5 / 15
गुरु ग्रहाला ज्ञान, संपत्ती, भाग्य, विवाह, संतती, धर्म आणि शुभतेचा कारक मानले जाते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरुची महादशा सुरू होते, तेव्हा तिचे परिणाम जीवनातील अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये जाणवतात. गुरूची महादशा एकूण १६ वर्षे असते. गुरूची महादशा व्यक्तीच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल, यश, आध्यात्मिक प्रगती आणि आर्थिक विकास घडवून आणू शकते, असे म्हटले जाते.
6 / 15
जर कुंडलीत गुरु कमजोर किंवा अशुभ असेल, तर हा काळ आव्हाने आणू शकतो. महादशेचे परिणाम गुरुची कुंडलीतील स्थिती, दृष्टी आणि राशीनुसार बदलू शकतात. अनेकांसाठी हा काळ करिअरमध्ये प्रगती, विवाहाची शक्यता, संतती सुख आणि वाढलेली सामाजिक प्रतिष्ठा घेऊन येतो, असे मानले जाते. मात्र, इतरांना या काळात निर्णय घेण्यातील गोंधळ, आर्थिक चढ-उतार किंवा आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
7 / 15
गुरू हा धनु आणि मीन राशीचा स्वामी मानला जातो. कर्क राशीत उच्च असतो. या राशींना गुरूची महादशा चांगली मानली जाते. गुरू शुभ स्थानात असेल, तर महादशा व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक परिणाम आणू शकते. गुरु शुभ स्थानी किंवा उच्च राशीत असेल, तर शुभ महादशा नोकरी, व्यवसायात प्रगती आणू शकते. नवीन जबाबदाऱ्या, पदोन्नती आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे.
8 / 15
शिक्षण, बँकिंग, प्रशासन, अध्यापन आणि धार्मिक कार्ये करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. गुरू ग्रह हा धन आणि समृद्धीचा कारक मानला जातो. त्यामुळे, त्याची अनुकूल स्थिती आर्थिक स्थिरता आणि गुंतवणुकीतून नफा मिळवून देऊ शकते. या काळात अनेक लोकांना जमीन, वाहन किंवा नवीन घर खरेदी करण्याची संधी मिळू शकते.
9 / 15
गुरु ग्रह विवाह आणि कौटुंबिक जीवनातही एक महत्त्वाचा घटक मानला जातो. गुरु शुभ स्थानी असेल, तर अविवाहित व्यक्तींसाठी विवाह शक्य होऊ शकतो, तर विवाहित व्यक्तींच्या नातेसंबंधात अधिक गोडवा येऊ शकतो. गुरु महादशेदरम्यान व्यक्तीचा कल धर्म, उपासना आणि अध्यात्माकडे वाढू शकतो. या काळात अनेक लोक धार्मिक तीर्थयात्रा करतात. गुरूंकडून मार्गदर्शन घेतात.
10 / 15
जन्मपत्रिकेत गुरू अशुभ स्थितीत असल्यास, त्या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी अडचणी येतात. ती व्यक्ती धार्मिक कार्यांकडे आकर्षित होत नाही. ती नास्तिकही असू शकते. निर्णय घेताना त्यांना गोंधळ जाणवू शकतो. वैवाहिक जीवन अनेकदा तणावपूर्ण असते. वैवाहिक सुखाची कमतरता जाणवते. विवाहात अडथळ्यांचा सामना करावा लागतो.
11 / 15
कुंडलीतील गुरुची स्थिती कमकुवत असेल आणि प्रतिकूल प्रभाव कमी करायचा असेल, तर गुरुवारी विशेष व्रत करावे. गुरुशी संबंधित वस्तू, पिवळ्या वस्तूंचे यथाशक्ती दान करावे. गुरुच्या नक्षत्रात केलेले हे दान अधिक शुभफलदायी मानले जाते.
12 / 15
देवानांच ऋषीणांच गुरुं कान्चनसन्निभम। बुद्धि भूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पितम्॥, हा नवग्रह स्तोत्रातील गुरुचा मंत्र आहे. ॐ बृं बृहस्पतये नम:॥, हा गुरुचा बीज मंत्र आहे. तर, ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु: प्रचोदयात॥, हा गुरुचा गायत्री मंत्र आहे. गुरू मंत्रांचा यथाशक्ती जप करावा.
13 / 15
तज्ज्ञांचा योग्य सल्ला आणि मार्गदर्शनानंतर गुरु यंत्राची स्थापना, पूजन करावे. तसेच गुरुचे रत्न पुष्कराज शास्त्रशुद्ध पद्धतीने धारण करावे. रुद्राक्षही धारण करता येऊ शकेल. मात्र, त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा, असे सांगितले जाते.
14 / 15
आठवड्यातील गुरुवार या दिवसावर गुरुचा अंमल असतो. गुरू ग्रह मजबूत करायचा असेल, तर गुरूवारी आवर्जून काही गोष्टी कराव्यात. भगवान विष्णू आणि बृहस्पती देवांची पूजा करा. पिवळे कपडे आणि पिवळ्या वस्तू दान करा. केळीच्या झाडाची पूजा करणे शुभ मानले जाते. गरजूंना हरभरा डाळ आणि हळद दान करा.
15 / 15
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिकdaily horoscopeदैनिक राशीभविष्य