शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुमच्या याच चुकांमुळे गळतात केस; अशी घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 7:26 PM

1 / 9
मुलगा असो मुलगी सर्वांनाच केस गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. अनेक लोकांना वाटतं की, चुकीचा शॅम्पू किंवा हेअर प्रोडक्ट्स जास्त वापर केल्यामुळे केस गळू लागतात.
2 / 9
अनेकदा असं होण्याचं खरं कारण तुम्ही केसांची न घेतलेली काळजी आणि केसांबाबत तुम्ही करत असलेल्या काही चुका ठरतात.
3 / 9
गरम पाण्याने केस धुतल्यामुळे हे्अर फॉलची समस्या वाढते. कारण गरम पाणी केस आणि स्काल्पवरील नॅचरल ऑइल काढून टाकतं. ज्यामुळे केस ड्राय होतात आणि गळू लागतात.
4 / 9
हेअर ड्रायरची गरम हवा केसांमधील प्रोटीन नष्ट करते. त्यामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढतं. अशातच हे्अर फॉलपासून सुटका करण्यासाठी केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करणं टाळा.
5 / 9
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे स्ट्रेसमध्ये राहणं ही प्रत्येकाचीच सवय बनली आहे. परंतु जास्त स्ट्रेस घेतल्यामुळे केस गळू लागतात.
6 / 9
जंक फूड्स किंवा जास्त मसाले असणाऱ्या पदार्थांचं सेवन केल्यामुळे शरीराला आवश्यक तेवढं प्रोटीन मिळत नाही. त्याचा परिणाम केसांवरही होतो. मोठ्या प्रमाणावर केस गळू लागतात. अशातच तुमच्या डाएटमध्ये हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचा सामावेश करा.
7 / 9
आपल्यापैकी प्रत्येकजण ही चुक करतं, केस ओले असतानाच विंचरतात. ओले केस विंचरल्यामुळे केसांची मुळं कमकुवत होतात आणि तुटतात.
8 / 9
केसांची व्यवस्थित निगा न राखल्यामुळे केस गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे केसांमध्ये डेड सेल्स जमा होतात. परिणामी केस गळण्याचं प्रमाण वाढतं.
9 / 9
तुमची झोप पूर्ण होत नसेल तरीदेखील तुम्हाला केस गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. एका रिसर्चमधून सिद्ध झाल्यानुसार झोप अपूर्ण राहिल्यामुळे त्या थेट परिणाम केसांवर होतो.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealthआरोग्य