केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी अगदी सोप्या घरगुती टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 04:43 PM2019-08-17T16:43:36+5:302019-08-17T16:49:42+5:30

मान्सूनमध्ये केसांमध्ये होणाऱ्या डॅन्ड्रफमुळे प्रत्येकजण त्रस्त असतो. वातावरणातील बदलांमुळे त्वचा ड्राय होते. त्यामुळे केसांमध्ये कोंड्याची समस्या उद्भवते. जर तुम्ही वेळीच काही उपाय केले तर अगदी सहज या समस्येपासून सुटका करून घेऊ शकता. पण जर दुर्लक्षं केलं तर मात्र ही समस्या वाढू शकते. आज आम्ही तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही केसांच्या समस्या दूर करू शकता.

दोन चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा. सकाळी मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट डोक्याच्या त्वचेवर लावा. 30 मिनिटं ठेवल्यानंतर रीठाच्या पाण्याने धुवून टाका.

आठवड्यातून 2 ते 3 वेळा केसांसाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर करा. यामुळे स्काल्पचा ड्रायनेस दूर होईल आणि पोषक तत्व केसांसाठी फायदेशीर ठरतील.

दोन कप नॉर्मल पाण्यामध्ये दोन कप सफरचंदाचं व्हिनेगर एकत्र करा आणि या पाण्याने केस धुवा. समस्या दूर होतील.

एका बाउलमध्ये 3 चमचे बेकिंग सोडा पावडर घ्या. त्यामध्ये 3 चमचे लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट स्काल्पला लावा.

खोबऱ्याच्या तेलामध्ये टी-ट्री ऑइल एकत्र करा आणि स्काल्पला लावून मालिश करा. अर्धा तास किंवा संपूर्ण रात्र तसचं ठेवा. त्यानंतर केमिकल्स कमी असणाऱ्या शॅम्पूच्या मदतीने केस स्वच्छ करा.

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.