शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कडूलिंब आणि मधाचा सोपा फेसपॅक, त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांवर रामबाण उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 3:15 PM

1 / 7
पिंपल्स, डाग, सुरकुत्या अशा त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या क्रीम आणि लोशनचा उपाय करत असतील. पण प्रत्येकवेळी याचा फायदा होईलच असे नाही. मात्र तुम्ही जर नैसर्गिक पद्धतींचा वापर करून घरगुती उपाय केले तर तुम्हाला नक्कीच फरक बघायला मिळेल.
2 / 7
कडूलिंब आणि मधाच्या फेसपॅकने तुम्ही तुमच्या त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करू शकता. त्वचेसंबंधी समस्या दूर करण्यासाठी कडूलिंबाचा वापर करणे सर्वात चांगला उपाय मानला जातो. जर तुम्ही कडूलिंबासोबत मधाचा वापर कराल तर त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या दूर होती. हा फेसपॅक तयार करण्यासाठी ३ ते ४ कडूलिंबाची पाने आणि १ चमचा मध घ्या.
3 / 7
सर्वातआधी कडूलिंबाची पाने २० मिनिटे पाण्यात बुडवून ठेवा. नंतर त्यांना बारीक करून पेस्ट तयार करा. त्यानंतर त्यात मध मिश्रित करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांसाठी तशीच ठेवा. थोड्या वेळाने चेहरा कोमट पाण्याने धुवा. (Image Credit : www.miamiobgyns.com)
4 / 7
तुम्हाला जर पिंपल्सची समस्या असेल तर बाहेरील औषधांवर भरमसाठ पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाहीय हा फेसपॅक लावून तुमची पिंपल्सची समस्या काही दिवसात दूर होईल. (Image Credit : www.lifetimestyles.com)
5 / 7
कडूलिंबाची पाने आणि मधाच्या फेसपॅकने त्वचा मुलायम होते. शुष्क त्वचेसाठी हा फेसपॅक फार फायदेशीर ठरतो.
6 / 7
शरीरावर कोणत्याही प्रकारचे घाव किंवा जळाल्याचे डाग असतील तर हा फेसपॅक लावू शकता. मधात अनेक नैसर्गिक औषधी गुण आहेत. त्यामुळेच याचा वापर वेगवेगळ्या समस्यांसाठी केला जातो.
7 / 7
पिंपल्स किंवा डागांसोबतच तुम्ही या फेसपॅकने ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेडपासूनही सुटका मिळवू शकता. या फेसपॅकच्या मदतीने तेलकट त्वचेची समस्याही दूर केली जाऊ शकते. तेलकट त्वचा असलेल्यांसाठी
टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्सAyurvedic Home Remediesघरगुती उपाय