आकर्षक नाकासाठी सर्जरीचा विचार सोडा, 'या' व्यायामांनी मिळवा सेलिब्रिटींसारखं नाक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 12:17 PM2020-03-12T12:17:38+5:302020-03-12T12:35:55+5:30

प्रत्येकालाच आपलं सुंदर असावं असं वाटत असतं. कारण आपण कितीही जाड झालो तरी चेहरा आणि नाक सुंदर असेल तर आपण नेहमी प्रेजेंटेबल दिसत असतो. नाक हे प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तीमत्वात भर टाकत असतं. त्यामुळे नाक कसं आकर्षक टोकदार आणि लांब दिसेल असा विचार प्रत्येकजण करत असतो.

मुलींना असं वाटत असतं की सर्जरी केल्यानंतरच नाक आकर्षक आणि हवं तसं मिळवता येतं पण असं नाही काही सोपे व्यायाम प्रकार रोज करून तुम्ही आपलं नाक लांब आणि आकर्षक ठेवू शकता.

जर तुम्हाला नाकाचा आकार व्यवस्थित हवा असले तर नोज शेपिंगचा व्यायाम करून तुम्ही मिळवू शकता. नाक शेपमध्ये आणण्यासाठी हाताच्या एका बोटाने नाकाचं एक छिद्र बंद करून दुसऱ्या छिद्राने श्वास घ्या आणि पुन्हा याचप्रकारे दुसऱ्या बाजूने छिद्रे बंद करून मोकळ्या छिद्रातून श्वास घ्या. याने नाक शेपमध्ये येईल.

जसजसं आपलं वय वाढतं, तसतसा आपल्या शरीरातील हाडं आणि मांसपेशींमध्ये बदल होतो. त्यामुळे लहान मुलांच्या मालिशवर जास्त भर दिला जातो. त्यांच्या नाकाशी मालिश करून योग्य शेप दिला जातो. नाक शेपमध्ये आणण्यासाठी बोट नाकाच्या शेंड्यावर लावून नाक खाली-वर करा. याने नाकाचा शेप योग्य राहील.

नाकाची मसाज करूनही नाक योग्य शेपमध्ये आणलं जाऊ शकतं. नाक वर-खाली आणि डावी-उजवीकडे क्रीम किंवा तेल लावून मसाज करून योग्य शेपमध्ये आणलं जाऊ शकतं. त्यासोबतच मालिश केल्याने सायनस आणि मायग्रेनची समस्याही दूर होऊ शकते.

श्वास आत घेऊन नाक डावी-उजवीकडे मुव्ह करा, याने नाक शेपमध्ये येण्यास मदत होईल. त्यासोबतच नाकाच्या छिद्रांना बंद करा आणि उघडा. या व्यायामाने नाकाच्या मांसपेशींना आराम मिळतो. हा व्यायाम एकदा करून नक्कीच फायदा होणार नाही. त्यासाठी रोज व्यायाम करणं गरजेचं आहे.

नाक दोन्ही बाजूने प्रेस केल्याने नाक बारीक केलं जाऊ शकतं. ही एक्सरसाइज करण्यासाठी दोन्ही हातांच्या बोटांनी नाकाच्या दोन्ही बाजूने दाबत पुढच्या बाजूने आणावे. ही एक्सरसाइज नाक शेपमध्ये आणण्यासाठी फायदेशीर ठरेल. हा व्यायाम प्रकार केल्याने तुमचं नाक लवचीक होईल.

सर्जरी न करता रोज नाकाचा व्यायाम करून तुम्ही चांगलं नाक मिळवू शकता.