शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मानेचा काळपटपणा स्कार्फने लपवू नका, त्याऐवजी 'हे' घरगुती उपाय करा, काळपटपणा छुमंतर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 7:16 PM

1 / 8
चेहऱ्याची काळजी (Face Care) घेताना आपण मानेवर अन्यायच करतो. चेहरा धुवतानाही आपण मान व्यवस्थित धुत नाही (Neck does not Wash Properly).
2 / 8
मानेकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि मान काळी पडली (Neck Turned Black) की मग लक्ष द्यायला लागतो.
3 / 8
मान चेहऱ्यासारखीच गोरी दिसावी याकरता आपण बरेच उपाय करतो. फेशियल, स्क्राबिंग, फेस पॅक हे सगळे उपाय चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी (Facial Beauty) केले जातात.
4 / 8
हळद आणि बेसन - बेसन त्वचेला एक्सफोलीएट (Exfoliate) करतं. त्यामुळे त्वचा तजेलदार होते. बेसनाने त्वचेच्या रोमन छिद्रांमध्ये साठलेली घाण देखील निघून जाते. 2 चमचा बेसनामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस, 1 चिमूट हळद आणि थोडंसं गुलाब पाणी घेऊन त्याची पेस्ट तयार करा. आपल्या मानेवर लावा. 15 मिनिटानंतर धुऊन टाका. आठवड्यातून दोनदा हा उपाय करा.
5 / 8
2 चमचा बेसनामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस, 1 चिमूट हळद आणि थोडंसं गुलाब पाणी घेऊन त्याची पेस्ट तयार करा. आपल्या मानेवर लावा. 15 मिनिटानंतर धुऊन टाका. आठवड्यातून दोनदा हा उपाय करा.
6 / 8
बेकिंग सोडा - बेकिंग सोड्यामधील घटक काळी पडलेली मान स्वच्छ करण्यामध्ये अतिशय फायदेशीर आहेत. 1 चमचा पाण्यामध्ये 2 चमचा बेकिंग सोडा मिसळा याची पेस्ट आपल्या मानेवर लावा. सुकल्यावर पाण्याने स्वच्छ धुवा. नियमितपणे वापरल्यास आपली मान गोरी होईल.
7 / 8
बटाटा - बटाट्यामध्ये ब्लीचिंग घटक असतात. ज्यामुळे आपली त्वचा तजेलदार होते. याशिवाय पिंपल्स कमी होतात. बटाट्याचा लगदा तयार करून त्याचा रस काढा. कापसाच्या बोळ्यावर घेऊन काळ्या भागावर लावा. पूर्णपणे सुकल्यानंतर धुऊन टाका.
8 / 8
मध आणि टोमॅटो - मध, टोमॅटोचा रस, लिंबाचा रस एकत्र करून ही पेस्ट आपल्या मानेवर लावा. 20 मिनिटांनी सुकल्यानंतर धुऊन टाका. आठवड्यातून 2 ते 3 वेळा याचा वापर केल्यास फरक नक्की जाणवेल.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स