शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लडाख सर करण्यासाठी बुलेटच का? कारण माहित आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 8:11 PM

1 / 8
लडाखला फिरायला जाणारे लोक नेहमी बुलेटसोबत असलेलेच फोटो पोस्ट करतात. बुलेट म्हटली की दोनच गोष्टी डोळ्यासमोर तरळतात. एक म्हणजे बंदुकीतून निघणारी गोळी आणि दुसरी रॉयल एन्फिल्डची मोटारसायकल.
2 / 8
भारतीयांना बुलेट जबरदस्त भावते. रेट्रो लुकवाली मोटारसायकल म्हटली की बुलेटच असे समीकरण बनले आहे. पण लडाखच्या टूरसाठी बुलेटच का वापरली जाते?
3 / 8
आपल्या आसपासचे, ओळखीचे बरेचजण लडाखला जाऊन आले आहेत. त्यांना विचारल्यास ते बुलेटच वापरल्याचे सांगतात. लडाखसारख्या खडतर भूप्रदेशात बुलेटला प्राधान्य देण्यामागे काही कारणे आहेत.
4 / 8
एकात बुलेट एक वजनदार बाईक आहे. यामुळे ती रस्ता धरून चालत राहते. हायवे किंवा डोंगरउतारावर रस्ता न सोडणाऱ्याच बाईकची गरज असते. कारण बाईक घसरण्याची शक्यता असते.
5 / 8
दुसरे कारण असे आहे की, बुलेटचे इंजिन जड असते तसेच ताकदवानही. यामुळे उणे तापमान असलेल्या भागातही हे इंजिन थंड पडत नाही. यामुळे इंजिन वाटेतच बंद न होता सुरू राहते.
6 / 8
वजनदार आणि दणकट असल्याने बुलेटवर मोठे वजन वाहून नेले जाऊ शकते. यामुळे जास्त सामानही सोबत नेता येते. जर कोणताही व्यक्ती लडाखच्या ट्रीपवर जाणार असेल तर हे जाहीर आहे की तो सोबत हव्या असलेल्या जास्तीत जास्त वस्तू घेऊन जाणार.
7 / 8
तिसरे कारण म्हणजे भारतात बुलेटला अशा प्रदेशातून सैर करण्यासाठी दुसरा पर्याय सहज उपलब्ध नाही.
8 / 8
बुलेटचे इंजिन 346 सीसीचे सिंगल सिलिंडरचे आहे. जे 5250 आरपीएमवर 20.1 बीएचपीची ताकद प्रदान करते. सध्याच्या बुलेटमध्ये एबीएस ब्रेकिंग सिस्टिम देण्यात आली आहे. सस्पेंशनही चांगले आहे.
टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डladakhलडाखtourismपर्यटन