स्वस्त Alto नाही, तर 'या' कारला मिळतेय ग्राहकांची पसंती; किंमतही कमी, मायलेजही जबरदस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 07:30 PM2022-06-14T19:30:23+5:302022-06-14T19:39:44+5:30

Maruti Suzuki Cars : भारतीय बाजारपेठेत मारूती सुझुकीच्या कार्स आजही मोठ्या प्रमाणात ग्राहकांच्या पसंतीस पडतात. उत्तम मायलेजसाठी या गाड्या ओळखल्या जातात.

Maruti Suzuki Cars : भारतीय बाजारपेठेत पॅसेंजर कार सेगमेंटमध्ये मारुती सुझुकीची क्वचितच अन्य कंपन्यांशी तुलना होऊ शकेल. अनेक दशकांपासून, मारुती सुझुकी देशांतर्गत बाजारपेठेत तिच्या किफायतशीर आणि सर्वोत्तम मायलेज कारसाठी ओळखली जाते.

मारुती अल्टो ही दीर्घकाळ सर्वाधिक विक्री होणारी कार आहे, परंतु मे महिन्यात कंपनीची टॉल बॉय म्हणून प्रसिद्ध असलेली WagonR ही सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे.

Maruti Suzuki WagonR ने गेल्या महिन्यात 16814 वाहनांची विक्री करून मे 2022 मध्ये भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचा किताब पटकावला आहे. मारूती सुझुकी वॅगन आर ची किंमत 5.44 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 7.08 लाख रुपयांपर्यंत जाते.

दुसरीकडे, जर मारुती अल्टोबद्दल सांगायचं झालं तर मे महिन्यात या कारच्या केवळ 12933 युनिट्सची विक्री झाली आहे. मारुती अल्टोची किंमत 3.39 लाखांपासून सुरू होते आणि 5.03 लाखांपर्यंत जाते.

मारुती वॅगनआर भारतीय बाजारपेठेत पेट्रोल इंजिन तसेच सीएनजी व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. टॉल-बॉय बॉक्सी डिझाइनमुळे, या कारला केबिनमध्ये चांगली जागा आणि लेगरूम देखील मिळतो. तर इंजिनबद्दल सांगायचं झालं तर ही कार दोन भिन्न पेट्रोल इंजिन्ससह येते.

या कारच्या एका व्हेरिअंटमध्ये 1.0 लिटर पेट्रोल इंजिन (68PS/90Nm) देण्यात आले आहे. तर दुसऱ्या व्हेरिअंटमध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन (83PS/113Nm) देण्यात आले आहे. याचं सीएनजी व्हेरिअंट 1.0 लीटर इंजिनसोबत येते जे 60PS ची पॉवर आणि 78Nm चं टॉर्क जेनरेट करते. ही कार 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमेटिक गिअरबॉक्ससह येते.

यात अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्ले, मॅन्युअल एसी, पॉवर विंडो, कीलेस एंट्री आणि स्टीयरिंग-माउंट ऑडिओ आणि कॉलिंग कंट्रोलसह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. मारुती वॅगन आर मध्ये सुरक्षेची देखील काळजी घेण्यात आली आहे.