1 / 8ईलेक्ट्रीक वाहनांच्या दुनियेत टेक्नॉलॉजीने धुमाकूळ उडविणाऱ्या ओला ईलेक्ट्रीक या कंपनीने स्कूटरमध्ये वेगवेगळे पर्याय दिल्यानंतर आता मोटरसायकल श्रेणीत उतरण्यास सुरुवात केली आहे. ओलाची रोडस्टर मोटरसायकल काही महिन्यांपूर्वी लाँच करण्यात आली होती. 2 / 8थोडी लेट असली तरी आता ती दाखल होऊ लागली आहे. सध्या तरी ही मोटरसायकल पाहण्यासाठी उपलब्ध असणार असून थोड्याच दिवसांत डिलिव्हरी आणि टेस्ट राईडसाठीही उपलब्ध होणार आहे. 3 / 8अनेकांना स्कूटर आवडत नाहीत. लांबचे रनिंग असेल किंवा उंची किंवा अन्य काही कारणे, परंतू इलेक्ट्रीक प्रकारात फारसे पर्याय उपलब्ध नव्हते. यामुळे अनेकांना स्कूटर घ्यावी लागली होती. तसेच काहींनी स्कूटर नकोच म्हणून ईलेक्ट्रीक वाहन घेणे टाळले होते. त्यांच्यासाठी आता नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. 4 / 8ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यातील फुगेवाडी एक्सपिरिअंस सेंटरमध्ये पाहण्यासाठी मिळणार आहे. काही दिवसांत या मोटरसायकलची टेस्ट राईडही सुरु होण्याची शक्यता आहे. तसेच ज्यांनी बुकिंग केले आहे त्यांना लवकरच डिलिव्हरी देखील सुरु होणार आहेत. 5 / 8ओलाची रोडस्टर तशी सामान्य मोटरसायकल सारखीच आहे, परंतू लुक वेगळा आहे. इंजिनच्या जागी पॅक बॅटरी आणि मोटर देण्यात आली आहे. 6 / 8चार्जर सीटखाली जोडलेल्या अवस्थेत येतो. तो तुम्ही रिमुव्हही करू शकता. आतमध्ये चार्जरचा बॉक्स जोडला की तुम्ही वायर बाहेर काढून चार्जिंगला लावू शकता.7 / 8तसेच या मोटरसायकलला क्लच नाही. यामुळे तुम्हाला क्लच दाबायची सवय असेल तर सुरुवातीला विचित्र वाटेल. कारण क्लचच्या जागी काहीच देण्यात आलेले नाही. 8 / 8आम्ही जी पाहिली ती रोडस्टर एक्स + होती. जिची रेंज साधारण २१०-२२० च्या आसपास दाखवत होती. 4.5kWh बॅटरी पॅकची ही मोटरसायकल होती. जिची सर्टिफाईड रेंज ही 252 km आहे.