शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

TATA च्या 'या' Electric SUV नं केली कमाल; 10 हजार गाड्यांची विक्री, 315 kms ची रेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 12:07 IST

1 / 10
भारतीय ऑटो सेक्टर आता तेजीनं इलेक्ट्रीफाईड होण्याच्या दिशेनं पुढे जात आहे. देशातील दिग्गज वाहन उत्पादक कंपन्या आता इलेक्ट्रीक वाहनांचंदेखील उत्पादन करू लागल्या आहेत. तर दुसरीकडे पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे ग्राहक इलेक्ट्रीक वाहनांसारख्या पर्यायांकडेही वळ आहेत.
2 / 10
टाटा मोटर्सच्या NEXON या Electric SUV ला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शुक्रवारी कंपनीनं आपल्या इलेक्ट्रीक वाहनांच्या तब्बल 10 हजार युनिट्सची विक्री झाल्याची माहिती दिली. यातील सर्वात मोठा वाटा हा Nexon EV ता असल्याचंही सांगण्यात आलं.
3 / 10
अलीकडेच कंपनीनं आपली स्वस्त इलेक्ट्रीक कार 2021 Tigor EV देखील सादर केली आहे. पूर्वी ही सेडान केवळ व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध होती, परंतु आता ती खासगी ग्राहकांसाठी सादर करण्यात आली आहे.
4 / 10
देशातील इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेईकल विभागात टाटा मोटर्सचा 70 टक्क्यांसह सर्वात मोठा वाटा आहे. टाटा मोटर्सची नेक्सॉन EV ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रीक कार आहे. कंपनीने सप्टेंबरच्या सुरुवातीला जाहीर केले होते की टाटा नेक्सन EV ने 6,000 पेक्षा जास्त युनिट्सचा विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. कंपनीने ही कार जानेवारी 2020 मध्ये लाँच केली.
5 / 10
सध्या इलेक्ट्रीक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढच आहे. तर दुसरीकडे नेक्सॉनचं इलेक्ट्रीक मॉडेल हे कंपनीच्या नेक्सॉन डिझेल या मॉडेललाही टक्कर देत असल्याचा दावा कंपनीनं यापूर्वी केला होता.
6 / 10
कंपनीला दर महिन्याला २ हजारांपेक्षा अधिक बुकिंग मिळत आहे. जेव्हा आम्ही ही कार लाँच केली तेव्हा दर महिन्याला ३०० बुकिंग मिळत होत्या. परंतु आता देशात इलेक्ट्रीक मोटर्सची मागणी वाढत आहे आणि ग्राहक टाटा मोटर्सवर विश्वास ठेवत आहेत, अशी प्रतिक्रिया टाटा मोटर्सचे प्रवासी वाहतूक व्यवसाय विभागाचे शैलेश चंद्रा यांनी यापूर्वी दिली होती
7 / 10
टाटा नेक्सॉन इलेक्ट्रीक एकूण पाच व्हेरिअंट्समध्ये बाजारात उपलब्ध आहे. त्याची किंमत 13.99 लाख ते 16.85 लाखांपर्यंत आहे. अलीकडेच, Nexon EV अपडेट करताना, काही विशेष फीचर्स जोडण्यात आले आहेत. आता यामध्ये बटण लेस आणि डायल-लेस इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. हा सांत इंचाचा डिस्प्ले आहे जो टाटाच्या कनेक्ट नेक्स्ट ऑपरेटिंग सिस्टम (OS) देण्यात आली आहे.
8 / 10
कंपनीने या एसयूव्हीमध्ये मजबूत बॅटरी पॅकसह काही आकर्षक वैशिष्ट्ये देखील समाविष्ट केली आहेत. यामध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, 7-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो हायलाइट्स, इलेक्ट्रीक सनरूफ, पार्क असिस्ट, ऑटो रेन सेन्सिंग वायपर, इलेक्ट्रीक टेलगेट असे फीचर्सही देण्यात आले आहेत.
9 / 10
यामध्ये कंपनीने 30.2 kWh क्षमतेची लिथियम-आयन लिक्विड कूल्ड बॅटरी पॅक देण्यात आली आहे. त्यात दिलेली इलेक्ट्रीक मोटर 127bhp ची दमदार पॉवर आणि 245Nm चा टॉर्क जनरेट करते.
10 / 10
कंपनीचा दावा आहे की ही इलेक्ट्रीक एसयूव्ही एका चार्जमध्ये 315 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. ही इलेक्ट्रीक एसयूव्ही फास्ट चार्जिंग सिस्टीमसह फक्त 1 तासात 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते, याशिवाय कारची बॅटरी नियमित चार्जरने पूर्ण चार्ज होण्यासाठी 8 ते 9 तास लागतात. ही देशातील सर्वात जास्त विकली जाणारी इलेक्ट्रीक कार आहे.
टॅग्स :TataटाटाElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनIndiaभारत