शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 11:11 IST

1 / 8
वस्तू आणि सेवा करमधील बदलांमुळे, वाहन निर्माता सातत्याने आपल्या वाहनाच्या किमती कमी करत आहेत.
2 / 8
सुझुकीच्या स्पोर्टी स्कूटर एव्होनिसची किंमत ७ हजार ८२३ ने कमी करण्यात आली. या स्कूटरची मूळक किंमत ९४ हजार होती. मात्र, आता ही स्कूटर ८६ हजार १७७ रुपयांत उपलब्ध असेल.
3 / 8
स्टायलिश स्कूटर बर्गमन स्ट्रीटची किंमत ८ हजार ३७३ ने कमी करण्यात आली. ही स्कूटर आता ९२ हजार २२७ हजारांत उपलब्ध असेल.
4 / 8
बर्गमन स्ट्रीट एक्स स्कूटर आणखी स्वस्त झाली आहे. या स्कूटरची किंमत १ लाख १७ हजार ७०० रुपये आहे. या मॉडेलची किंमत ९ हजार ७९८ ने कमी करण्यात आली.
5 / 8
बेस जिक्सर मॉडेलची किंमत ११ हजार ५२० रुपयांनी कमी झाली. ही बाईक आता १ लाख २६ हजार ८८१ मध्ये उपलब्ध आहे. या बाईकची किंमत १ लाख ३८ हजार ४०१ रुपये होती.
6 / 8
सुझुकी जिक्सर एस एफची किंमत १२ हजार ३११ ने कमी करण्यात आली. ही बाईक १ लाख ३५ हजार ९०१ हजारात खरेदी करता येईल.
7 / 8
जिक्सर २५० आता १ लाख ८१ हजार ९७६ मध्ये उपलब्ध असेल. या बाईकची किंमत १६ हजार ५२५ रुपयांनी किमी करण्यात आली.
8 / 8
सुझुकी व्ही स्ट्रोम एसएक्सची किंमत १७ हजार ९८२ ने कमी करण्यात आली. ही बाईक आता १ लाख ९८ हजार १८ रुपयांत उपलब्ध असेल.
टॅग्स :bikeबाईकAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग