शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 16:31 IST

1 / 8
Royal Enfield Meteor 350 Launch: रॉयल एनफिल्डने आपली लोकप्रिय क्रूझर बाईक Meteor 350 नव्या रुपात बाजारात आणली आहे. नवीन GST स्ट्रक्चरनंतर कंपनीची ही पहिली बाईक असून, यावर फक्त १८% जीएसटी लागणार आहे. त्यामुळे तिची सुरुवातीची किंमत केवळ ₹1,95,762 (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.
2 / 8
कंपनीच्या मते, हे नवे मॉडेल केवळ डिझाइन व फीचर्समध्येच नाही, तर राइडिंग एक्स्पीरियन्समध्येही अपग्रेडेड आहे. या बाईकमध्ये अनेक बदल केले गेले असून, ती मागील मॉडेलच्या तुलनेत अधिक आकर्षक बनली आहे. ही Meteor अनेक व्हेरिएंट्स आणि नव्या कलर शेड्समध्ये सादर करण्यात आली आहे, ज्यामुळे रायडर्सना त्यांच्या पर्सनॅलिटी आणि स्टाइलनुसार विविध पर्याय मिळतात.
3 / 8
डिझाइन आणि अपडेट- रॉयल एनफिल्डने आपला क्रूझर डीएनए कायम ठेवत Meteor 350 ला आणखी स्टायलिश बनवले आहे. नवा कलर पॅलेट आणि प्रीमियम फिनिशिंगमुळे बाईकला क्लासिक आणि मॉडर्न, असा दोन्ही फिल मिळतो. लो-सेट सीट, टिअरड्रॉप फ्युअल टँक आणि रॉयल एनफिल्डचा सिग्नेचर एक्झॉस्ट साऊंडमुळे बाईकची खास ओळख टिकून आहे.
4 / 8
व्हेरिएंट्स, कलर ऑप्शन्स आणि किंमत- 1. फायरबॉल – (फायरबॉल ऑरेंज, फायरबॉल ग्रे | ₹1,95,762) 2. स्टेलर – (स्टेलर मॅट ग्रे, स्टेलर मरीन ब्ल्यू | ₹2,03,419 (केवळ केरळमध्ये ₹1,99,990) 3. ऑरोरा – (ऑरोरा रेट्रो ग्रीन, ऑरोरा रेड | ₹2,06,290) 4. (सुपरनोवा – सुपरनोवा ब्लॅक | ₹2,15,883)
5 / 8
इंजिन आणि परफॉर्मन्स- नव्या Meteor 350 मध्ये 349cc क्षमतेचा सिंगल-सिलिंडर, एअर-ऑइल कूल्ड इंजिन देण्यात आला आहे, जे 20.2 BHP पॉवर आणि 27 Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन ५-स्पीड गिअरबॉक्ससोबत जोडलेला आहे. स्मूद पॉवर डिलिव्हरी आणि उत्तम टॉर्कसाठी हे इंजिन ओळखले जाते. हायवे क्रूझिंग आणि अर्बन रायडिंगसाठी ही बाईक उत्तम परफॉर्मन्स देईल, असा कंपनीचा दावा आहे.
6 / 8
कम्फर्ट आणि रायड क्वालिटी- Meteor 350 विशेषतः टुरिंग रायडर्स लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. आरामदायी सीटिंग पोजिशन, सस्पेन्शन सेटअप आणि लो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही उत्तम ठरते.
7 / 8
जेन्युइन अॅक्सेसरीज (GMA)- 1. अर्बन किट : (ब्लॅक ड्रॅग हँडलबार, लो रायडर सीट, टिंटेड फ्लायस्क्रीन, ब्लॅक मिरर) 2. ग्रँड टुरर किट : (टुरिंग सीट, प्रीमियम पॅनियर्स, लॉन्गहॉल रेल्स, एलईडी फॉग लॅम्प्स, डिलक्स फूट पेग्स.)
8 / 8
7 वर्षांची वॉरंटी- Meteor 350 आता अधिक विश्वासार्ह झाली आहे. याचे कारण, कंपनीने तिची वॉरंटी वाढवली आहे. बाईकवर 3 वर्षे / 30,000 किमी स्टँडर्ड वॉरंटी दिली जाईल. ग्राहकांना हवे असल्यास ती आणखी 4 वर्षे / 40,000 किमी पर्यंत वाढवता येईल. म्हणजेच बाईकवर एकूण 7 वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी आणि रोडसाइड असिस्टन्स उपलब्ध आहे.
टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डbikeबाईकAutomobileवाहन