शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोराने चोच मारून काच फोडली, कुत्र्यांनी चावून नुकसान केले; कार इन्शुरन्स क्लेमची कारणे...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 9:53 AM

1 / 7
इन्शुरन्स कंपन्यांनी कारचे नुकसान झाल्याचे क्लेमची कारणे पाहून डोक्याला हात लावले आहेत. कोणाच्या गाडीवर नारळ पडला, कोणी म्हणतेय त्यांच्या गाडीला कुत्र्यांनी नुकसान केले. एकाने तर कारच्या काचेच एका मोराने त्याचे प्रतिबिंब पाहून चोचीने काच फोडल्याचा दावा केला आहे. गेल्या वर्षी असे अनेक दावे करण्यात आले आहेत.
2 / 7
असे दावे फेटाळायचे की पास करायचे या चिंतेत इन्शुरन्स कंपन्या आहेत. सामान्यता अपघात झाला की कंपन्यांना तो अपघात कसा झाला हे पटवून द्यायचे असते. कंपन्यांकडे अनेक क्लेम येत असतात. कोणची गाडी घासलेली असते, कोणाची चेपलेली, कोणाची पूर्ण डॅमेज झालेली. हा खर्च पाहून कंपन्या ती दुरुस्त करायची की स्क्रॅप करायची ते ठरवितात.
3 / 7
विमा कंपन्यांनी केलेल्या क्लेममध्ये पहिल्या क्रमांकावर मागून टक्कर लागल्याचे क्लेम आहेत. तर समोरा-समोर टक्कर देण्याचे क्लेम दुसऱ्या क्रमांकावर आहेत. हिट अँड रन केसचे क्लेम तिसऱ्या क्रमांकावर असतात. झाडाच्या फांद्या पडून नुकसान झाल्याची कारणेही या यादीत असतात. अशा प्रकरणात कंपन्या हजारोंच्या संख्येने क्लेम पास करतात.
4 / 7
परंतु पेच अशा क्लेममध्ये फसतो, ज्या क्लेममध्ये प्राण्यांनी नुकसान केल्याचे कारण असते. आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांतून हत्तींनी नुकसान केल्याचे क्लेम येतात. गो डिजिट या कंपनीने अशा २० प्रकरणांत पैसे दिल्याचे म्हटले आहे.
5 / 7
भटक्या कुत्र्यांनी देखील उपद्व्याप केले आहेत. भटक्या कुत्र्यांमुळे वाहनांचे नुकसान झाल्याची 110 प्रकरणे लखनौमधील इंदिरा नगर या एका भागात नोंदवली गेली होती.
6 / 7
सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या अपघातांच्या कारणांचा डाटाबेस ठेवत नाहीत तरी त्यांच्या प्रतिनिधींनी माहिती दिली आहे. रागावलेले मोर कारवरील प्रतिबिंब पाहतात आणि नुकसान करतात. अशीही एक घटना घडली की बांधकामाच्या ठिकाणी कार खड्ड्यात पडली आणि ती बाहेर काढता आली नाही.
7 / 7
म्हशी आणि शेळ्यांनीही गाडीचे नुकसान केल्याचे अनेक दावे करण्यात आले. माकडांनी त्यांच्याकडील वस्तू फेकून कारचे वेगवेगळे पार्ट तोडल्याचे दावेही करण्यात आले आहेत. हे दावे काही खोटे नाहीत. जगभरात अशा घटना घडत असतात.
टॅग्स :carकार