नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
1 / 7 Nitin Gadkari on Electric Vehicle: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रीक वाहनांबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. येत्या एक वर्षात इलेक्ट्रीक वाहनांची किंमत पेट्रोल कारच्या किमतीएवढी असेल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. ही बातमी इलेक्ट्रीक कार आणि दुचाकीस्वारांना दिलासा देणारी आहे.2 / 7 इलेक्ट्रीक वाहनांच्या किमती कमी होणार- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, तंत्रज्ञान आणि हरित इंधनातील जलद प्रगतीमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती येत्या काळात कमी होतील. याचा सर्वाधिक फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. पुढील दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनाची किंमत पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या बरोबरीला येईल. त्यामुळे आगामी काळात इलेक्ट्रीक वाहनांमध्ये मोठी क्रांती होऊ शकते, असे गडकरी म्हणाले.3 / 7 प्रदूषणाची पातळी कमी होईल-याशिवाय, नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या 2022-23 च्या अनुदानाच्या मागण्यांवर लोकसभेत उत्तर देताना सांगितले होते की, सध्या प्रभावी स्वदेशी इंधनाकडे जाण्याची गरज आहे. यामुळे देशातील प्रदूषणाची पातळीही कमी होईल. प्रदूषण हे केवळ भारतासमोरच नाही, तर जगभरात मोठे आव्हान आहे.4 / 7 गडकरींचे खासदारांना आव्हान-यासोबतच केंद्रीय गडकरी यांनी देशातील सर्व खासदारांना हायड्रोजन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहनही केले. खासदारांनी आपापल्या भागातील सांडपाण्याचे पाणी ग्रीन हायड्रोजनमध्ये बदलण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. लवकरच हायड्रोजन हा सर्वात स्वस्त इंधन पर्याय असेल, असेही त्यांनी सांगितले.5 / 7 बॅटऱ्यांच्या किमती कमी होणार- नितीन गडकरी पुढे म्हणाले, लिथियम आयन बॅटरीच्या किमती झपाट्याने कमी होत आहेत. आम्ही झिंक-आयन, अॅल्युमिनियम-आयन, सोडियम-आयन बॅटरी विकसित करत आहोत. जास्तीत जास्त दोन वर्षात इलेक्ट्रिक स्कूटर, कार, ऑटो रिक्षाची किंमत पेट्रोलवर चालणारी स्कूटर, कार, ऑटो रिक्षाच्या बरोबरीची असेल.6 / 7 जाणून घ्या खर्चात किती फरक पडेल- केंद्रीय मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, याचा फायदा असा होईल की, जर तुम्ही आज पेट्रोलवर 100 रुपये खर्च करत असाल तर इलेक्ट्रिक वाहन चालवताना हा खर्च 10 रुपयांवर येईल. काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी ग्रीन हायड्रोजन फ्युएल कार लाँच केली होती. नितीन गडकरी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.7 / 7 ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या कारची किंमत प्रति किमी 1 रुपये पेक्षा कमी आहे, तर पेट्रोल कारची किंमत 5-7 रुपये प्रति किमी आहे. आता कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांवरही काम करत आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या FCEV टोयोटा मिराई कारचा या पायलट प्रोजेक्टमध्ये समावेश आहे.