1 / 9वाहनाच्या विम्यांच्या रकमेमुळे तुम्ही त्रस्त असाल तर थोडे थांबा. विमा संचलित करणारी संस्था IRDAI ने बुधवारी नव्या नियमांची घोषणा केली आहे. आता वाहन मालकच विम्याची रक्कम ठरवू शकणार आहेत. हे नवे नियम तात्काळ लागू करण्यात आले आहेत. 2 / 9इरडाने आता सामान्य विमाधारकांना अॅड ऑन निवडण्याचा पर्याय दिला आहे. यामुळे त्याला त्याच्या ड्रायव्हिंगच्या सवयीचा फायदा मिळणार आहे. यामध्ये पे अॅझ यू ड्राईव्ह आणि पे हाऊ यू ड्राईव्ह सारखे फिचर्स असणार आहेत. म्हणजेच तुमच्या चालवण्यानुसार तुम्हाला पैसे पे करावे लागणार आहेत. 3 / 9टेलिमॅटीक्स आधारित मोटर विमा योजनेद्वारे वाहनाचा वापर किंवा ड्रायव्हिंगची सवय यानुसार प्रिमिअम रकमेत बदल होणार आहे. 4 / 9याचबरोबर आणखी एक महत्वाचा नियम बदलण्यात आला आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या नावे एकापेक्षा जास्त वाहने आहेत, तर तो टेलिमॅटीक्सच्या आधारे वाहन विमा योजनांचा लाभ घेऊ शकतो. तो नव्या नियमांनुसार एकाच विम्यावर सर्व गाड्यांसाठी कव्हरेज घेऊ शकतो. तो किती वाहने चालवितो, यावर विम्याची रक्कम ठरणार आहे. 5 / 9मोटर विम्याची संकल्पना सतत विकसित होत आहे. तंत्रज्ञानाच्या येण्याने मनोरंजक परंतु आव्हानात्मक मागण्या पूर्ण करण्यासाठी सतत बदल करावा लागत आहे. त्यांच्याशी सुसंगत असणे आवश्यक आहे, असे इरडाने म्हटले आहे. 6 / 9IRDAI ने सामान्य विमा कंपन्यांना नवीन विमा उत्पादनांना मंजुरी दिली आहे. नवीन मोटार विमा नियमांनुसार, नियमितपणे चालणाऱ्या वाहनाच्या अंतरावर आधारित विम्यावरील प्रीमियमची रक्कम ठरवता येते. 7 / 9वाहनाचा वापर कमी असल्यास, एखादी व्यक्ती वापर-आधारित कव्हरची निवड करू शकते आणि त्याचे फायदे घेऊ शकते. एका महिन्यात वाहनाने कापलेले जास्तीत जास्त अंतर देखील प्रीमियम दरावर येण्यासाठी घेतले जाऊ शकते.8 / 9खराब किंवा घाईघाईने ड्रायव्हिंग करत असल्यास त्याला विम्याची जादा रक्कम भरावी लागेल. बल पोझिशनिंग सिस्टीम किंवा जीपीएसद्वारे वाहन चालवण्याच्या पद्धतीचे निरीक्षण केले जाणार आहे. यासाठी वाहनांना जीपीएस लावले जाणार आहे. 9 / 9याशिवाय जीपीएसच्या मदतीने विमा कंपनीला विशिष्ट वाहनाचा ड्रायव्हिंग पॅटर्नही कळू शकेल. तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्येक वाहनाला ड्रायव्हिंग स्कोअर मिळेल, ज्याच्या आधारे वाहन मालक किती प्रीमियम भरायचा हे ठरवले जाईल.