एमजी हेक्टर अन् डेंजर समजला जाणारा 'खोब्याचा' घाट रस्ता; १५०० किमीच्या अंतरात मायलेजने धक्का दिला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 17:44 IST
1 / 8देशातील पहिली इंटरनेट कार, मोठाला सनरुफ, भलीमोठी स्क्रीन आणि अनेक कनेक्टेड फिचर्स एमजी कंपनीची हेक्टर. या कारने जेव्हा भारतात आलेली तेव्हा भल्या भल्यांना वेड लावले होते. एमजी हेक्टरची डिझेल मॅन्युअल व्हेरिअंट आम्ही दऱ्याखोऱ्यांच्या रस्त्यांतून सुमारे १५०० किमी चालविली. इंटरनेट कार असल्याने फिचर्स तर भरभरून होतीच पण या गाडीच्या मायलेजने जबरदस्त धक्का दिला, सुखद. चला पाहुया ही कार कशी वाटली. 2 / 8एमजी हेक्टर दिसायला तशी इनोव्हाच, पण पाच सीटर. या कारचे सस्पेंशन खूप चांगले आहे. आम्ही पुणे ते पार अगदी तळकोकणात बांद्यापर्यंत ही कार दामटवली. पुण्यातील नववर्षानिमित्त बाहेर चाललेले ट्रॅफिक, कोकणात उतरणारा वळणावळणांचा आणि सर्वात खोल उताराचा म्हणून मालवाहू चालकांमध्ये कुप्रसिद्ध असलेला अणुस्कुरा घाट. खूप उतार असल्याने या घाटाला ट्रक, बस चालकांत खोब्याच्या घाट म्हणून ओळखले जाते.3 / 8तसे फारसे यावेळी खड्डे कुठे जाणवले नाहीत. पण आम्ही त्याचसाठी गणपतीपुळ्याहून परतताना मुद्दाम गेली कित्येक वर्षे काम सुरु असलेला मुंबई-गोवा हायवे पकडला. खड्ड्यात गाडी आदळली पण आतमध्ये हादरे बसू दिले नाहीत. 4 / 8पॉवर्ड फ्रंट सीट्स, व्हेंटिलेटेड सीट्स, अॅम्बियंट लाइटिंग, क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ३६० डिग्री कॅमेरा, सनरूफ आदी गोष्टींमुळे प्रवास एकदम निवांत, सुखकर झाला. 10.4 इंचाची टच स्क्रीन जी आजवर कोणत्याही कारमध्ये उपलब्ध नाही, इन्फोटेन्मेंट सिस्टीम, सगळ्याचे कंट्रोल त्या स्क्रीनवर आहेत. 5 / 8मॅन्युअल गिअर असल्याने सुरुवातीला पिकअपबाबत थोडी साशंकता येऊ लागली. परंतू, नंतर सरावल्याने पिकअपची समस्या जाणवली नाही. ७ स्पीड गिअरबॉक्स असल्याने मोकळ्या रस्त्यावर, हायवेवर सहावा गिअर टाकता येत होता. इतर वेळी ४-५ व्या गिअरवरच विसंबून रहावे लागत होते. तरीही या कारने आम्हाला चांगले मायलेज दिले. 6 / 8हायवेवर आम्हाला २०.८ चे मालयेज या कारने दिले. इतर प्रवासातही कारने १५-१६ चे मायलेज दिले. थोडा थंडावा असला तरी बाहेर उन असल्याने एसी पूर्ण प्रवासात सुरुच होता. १५०० किमीपैकी बरेचशे अंतर हे गावातील एकेरी रस्ते, फारफारतर दोन कार निघू शकतील एवढ्या मोठाल्या वळणावळणाच्या रस्त्यांवरून चालविली. कुठेही वळणावर कंट्रोल सुटलाय असे जाणवले नाही. 7 / 8रात्रीच्या वेळी लाईटचा थ्रो चांगला वाटला. समोरून येणाऱ्या लोकांच्या डोळ्यात फेकणारा वाटला नाही. लगेज स्पेसही चांगला दोन आठवड्यांचे सामान नेता येईल एवढे आहे. डोअरमध्ये देखील लांबच्या प्रवासासाठी बऱ्यापैकी पाण्याच्या बॉटल बसू शकतील एवढी आहे. गॉगल ठेवायला सनरुफकडे जागा आहे. इंस्ट्रूमेंट क्लस्टरवर टीपीएमएस, वॉर्निंग आदी गोष्टी ठळक दिसतील अशा दिलेल्या आहेत. वेळोवेळी सर्व माहिती तिथे दिसते.8 / 8चार-पाच जणांच्या फॅमिलीसाठी, हायटेक फिचर्स हवे असलेल्या युथसाठी, जनरेशन झेड साठी ही कार योग्य आहे. मायलेज चांगले असल्याने, सहा एअरबॅग असल्याने व आरामदायी असल्याने लांबच्या प्रवासासाठी देखील ही कार चांगली आहे.