२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 12:45 IST
1 / 7 Mahindra Cars Offer: तुम्ही Mahindra कंपनीची एखादी गाडी विकत घेण्याचा विचार करत असाल, तर ऑगस्टमध्ये तुमच्याकडे २ लाख ९५ हजार रुपयांपर्यंत बचत करण्याची उत्तम संधी आहे. Thar, Thar Roxx, Scorpio, XUV400, XUV700, Marazzo आणि Bolero सारख्या मॉडेल्सवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. या डिस्काउंटमध्ये एक्सचेंज/स्क्रॅप बोनस, अॅक्सेसरीज पॅकेज आणि कॉर्पोरेट ऑफर समाविष्ट आहे. कोणत्या मॉडेलवर किती डिस्काउंट आहे? पाहा...2 / 7Mahindra Bolero Discount- Gaadiwaadi च्या रिपोर्टनुसार, ऑगस्टमध्ये Bolero Neo N10 वर १.३९ लाख रुपयांपर्यंत, Bolero B6 Opt वर १.३० लाख रुपयांपर्यंत, Bolero वर १,१०,७०० लाख रुपयांपर्यंत (२० हजार रुपयांच्या अॅक्सेसरीजसह), Bolero Neo वर १.०९ लाख रुपयांपर्यंत (३० हजार रुपयांच्या अॅक्सेसरीजसह) आणि Bolero Neo Plus वर ८५००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.3 / 7Mahindra Thar Discount- महिंद्राच्या या लोकप्रिय एसयूव्हीने सर्वांनाच वेड लावले आहे. या एसयूव्हीच्या ३ डोअर आणि ५ डोअर, दोन्ही मॉडेल्सवर सूट दिली जात आहे. या दोन्ही मॉडेल्सवर २५ हजार रुपयांपर्यंत बचत करण्याची उत्तम संधी आहे.4 / 7Mahindra Scorpio Discount- ऑगस्टमध्ये Scorpio Classic वर ७० हजार रुपये (अधिक ३० हजार अॅक्सेसरीज) आणि Scorpio N वर ५५ हजार रुपयांपर्यंत (अधिक २० हजार अॅक्सेसरीज) सूट दिली जात आहे.5 / 7Mahindra XUV400 Discount- ऑगस्टमध्ये महिंद्राच्या या एसयूव्हीवर तुम्हाला सर्वाधिक लाभ मिळेल. या कारवर २ लाख ९५ हजार रुपयांपर्यंतची बंपर सूट दिली जात आहे.6 / 7XUV700 आणि Marazzo- महिंद्राच्या XUV700 वर ५० हजार रुपयांपर्यंत (अधिक १५ हजार रुपयांच्या अॅक्सेसरीज) सूट दिली जात आहे, तर मराझो खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ३५ हजार रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी मिळेल.7 / 7टीप: ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असून, ऑफरची रक्कम व्हेरिएंट, स्थान आणि स्टॉक उपलब्धतेनुसार बदलू शकते. तुमच्या शहरात कोणत्या मॉडेलवर किती सूट उपलब्ध आहे? हे जाणून घेण्यासाठी जवळच्या महिंद्रा डीलरशिपशी संपर्क साधा.