Mahindra चा मेगा प्लान! २०२७ पर्यंत ८ इलेक्ट्रिक कार सादर करणार; स्वदेशी कंपनीचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 17:24 IST
1 / 9केंद्रातील मोदी सरकारने देशावासीयांना काही प्रमाणात दिलासा दिला असला तरी आताच्या घडीला पेट्रोल आणि डिझेलचे दर सार्वकालिक उच्चांकावर आहेत. त्यामुळे बहुतांश ग्राहक आता हळूहळू इलेक्ट्रिक कार सेगमेंटकडे वळताना दिसत आहे. 2 / 9सध्या देशात इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये TATA आघाडीवर आहे. Tata Motors ने Tata Nexon EV, Tata Tigor EV या दोन इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत. तसेच आगामी काळात आणखी १० इलेक्ट्रिक कार सादर करणार असल्याचे जाहीर केले आहे. 3 / 9यातच आता TATA नंतर स्वदेशी कार निर्माता कंपनी Mahindra ने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये पाऊल टाकायचा निर्णय घेतला असून, सन २०२७ पर्यंत ८ इलेक्ट्रिक कार सादर करणार असल्याचे सांगितले जात आहे. 4 / 9Mahindra पुढील वर्षीपासून भारतात इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याचा विचार करत असून, यामध्ये पहिला क्रमांक महिंद्रा eKUV100 इलेक्ट्रिकचा लागणार असल्याचे सांगितले जात आहे. महिंद्राची मायक्रो SUV Mahindra KUV100 इलेक्ट्रिकचे ऑटो एक्सपो २०२० मध्ये पहिल्यांदा अनावरण करण्यात आले होते. 5 / 9Mahindra eKUV100 किंवा Mahindra KUV100 EV ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक SUV असेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. अलीकडेच ही इलेक्ट्रिक कार टेस्टिंगदरम्यान स्पॉट झाल्याचे पाहायला मिळाले आहे.6 / 9या कारचा लूक फॉसिल फ्यूल व्हेरिएंटसारखा असेल. तसेच या कारममध्ये महिंद्रा 40Kw इलेक्ट्रिक मोटर सेटअप ऑफर करेल. यात 15.9kWh बॅटरी पॅक असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिंद्रा KUV100 इलेक्ट्रिक सिंगल चार्जमध्ये १४० किमी पर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देईल.7 / 9या कारच्या चार्जिंग क्षमतेबद्दल बोलायचे झाले तर, घरच्या घरी एसी चार्जरच्या मदतीने तुम्ही या कारची बॅटरी ६ तासात पूर्णपणे चार्ज करु शकता. त्याच वेळी, DC फास्ट चार्जिंगद्वारे, ही बॅटरी एका तासापेक्षा कमी वेळेत ८० टक्के पर्यंत चार्ज केली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. 8 / 9सन २०२७ पर्यंत महिंद्रा एकूण ३० वाहने भारतीय बाजारपेठेत सादर करणार असून, यापैकी १६ वाहने इलेक्ट्रिक सेगमेंटमधील असतील. तसेच या १६ पैकी ८ वाहने पेजेंसर सेगमेंटमधील असतील, तर उर्वरित ८ हलकी व्यावसायिक वाहन असतील, असे सांगितले जात आहे. 9 / 9टाटा मोटर्स कंपनी लवकरच टाटा पंचचे इलेक्ट्रिक व्हेरिएंट लाँच करु शकते आणि त्यानंतर KUV100 इलेक्ट्रिक थेट पंच इलेक्ट्रिकशी स्पर्धा करेल, अशी चर्चा असून, लोकप्रियतेच्या बाबतीत कोणती कार बाजी मारणार, याची उत्सुकता असल्याचे सांगितले जात आहे.