शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mahindra ची कमाल! महाराष्ट्रात लॉंच केली ई-रिक्षा; ३७ हजारांची सूट, रेंज किती मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 2:58 PM

1 / 12
गेल्या काही महिन्यांपासून अनेकविध कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात उतरत असून, नवनवीन इलेक्ट्रिक वाहने सादर केली जात आहेत. आताच्या घडीला इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टाटा मोटर्स आघाडीवर आहे.
2 / 12
देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपनी असलेल्या Mahindra & Mahindra नेही इलेक्ट्रिक कार सादर करणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, यापूर्वी Mahindra ने महाराष्ट्रात ई-रिक्षा लॉंच केली आहे.
3 / 12
Mahindra Treo इलेक्ट्रिक रिक्षा महाराष्ट्रात लाँच करण्यात आली आहे. याची किंमत २ लाख ९ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक रिक्षावर राज्याकडून ३० हजार रुपयाची सूट दिली जाणार आहे.
4 / 12
३१ डिसेंबर आधी खरेदी केल्यास ३७ हजार रुपयाची सूट दिली जाणार आहे. कंपनीचा दावा आहे की, हे सीएनजीच्या तुलनेत ५ वर्षात २ लाख रुपयाची बचत करू शकते. लवकरच Mahindra Treo देशातील अन्य काही राज्यांमध्येही विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
5 / 12
देशात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री दिवसेंदिवस वाढत आहे. यात तीन चाकी वाहनांचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे ही मागणी लक्षात घेऊन कंपनीने देशातील सर्वात जास्त विकली जाणारी इलेक्ट्रिक तीनचाकी ट्रियोला महाराष्ट्रात लाँच केले आहे.
6 / 12
Mahindra Treo च्या स्पेसिफिकेशनमध्ये आधुनिक लिथियम आयन बॅटरी सोबत येते. ही ई-रिक्षा स्टँडर्ड स्थितीत ० ते १०० टक्के तीन ते चार तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. Mahindra Treo चा टॉप स्पीड ४५ किमी प्रति तास इतका आहे. याची प्रमाणित रेंज १७० किमी आणि ड्रायविंग रेंज १३० किमी आहे.
7 / 12
Mahindra Treo च्या सस्पेंशन मध्ये पुढच्या बाजुला फ्रंटला हेलिकल स्प्रिंग प्लस डॅम्पर प्लस हायड्रोलिक शॉक एब्जॉर्बर, रिजिड रियर एक्सल, लीफ स्प्रिंग आणि शॉक एब्जॉर्बर दिले आहेत. ब्रेकिंगसाठी पुढच्या बाजुला आणि मागील बाजुला हायड्रोलिक प्रकारचे ब्रेक देण्यात आले आहेत.
8 / 12
Mahindra Treo ५० पैशात १ किलोमीटरचे अंतर पार करू शकते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. ही इलेक्ट्रिक रिक्षा ४२ न्यूटन मीटरचे टॉर्क जनरेट करते. या इलेक्ट्रिक रिक्षावर ३ वर्षात ८० हजार किमीची वॉरंटी दिली जात आहे.
9 / 12
Mahindra Treo ची अधिक माहिती 1800 120 150150 वर मिस्ड कॉल देवून मिळवता येऊ शकते. या इलेक्ट्रिक रिक्षाला ४१ हजार ५०० रुपयाच्या डाउनपेमेंटवर खरेदी करता येऊ शकते. यासाठी महिंद्रा फायनान्स मदत करणार आहे.
10 / 12
Mahindra Treo च्या देशभरात १३ हजार यूनिटची विक्री झाली आहे. आपल्या सेगमेंट मध्ये ६७ टक्के भागीदारी ठेवली आहे. या इलेक्ट्रिक रिक्षा यूनिटसाठी परमिट, रोड टॅक्स आणि रजिस्ट्रेशनची सुद्धा गरज पडत नाही.
11 / 12
सामान्य किंवा सीएनजी रिक्षाच्या बदल्यात ग्राहक इलेक्ट्रिक रिक्षाची निवड करू शकतात. जे शहरात ट्रान्सपोर्टसाठी फायदेशीर आहे. महिंद्रा आपल्या कमर्शियल तीनचाकी वाहन सेगमेंट मध्ये इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढवण्यासाठी काम करीत आहे.
12 / 12
सन २०२५ पर्यंत देशात तीनचाकी वाहन सेगमेंट मध्ये ३० टक्के इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. कमर्शियल तीनचाकी वाहन सेगमेंट मध्ये डिझेलने इलेक्ट्रिक वाहनात परिवर्तन पाहून कंपनीने लवकरच बाजारात ५ नवीन इलेक्ट्रिक वाहने घेऊन येणार असल्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे.
टॅग्स :Mahindraमहिंद्राelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनAnand Mahindraआनंद महिंद्रा