शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Kia मोटर्सची भारतातील पहिली कार Seltos लाँच; पाहा किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 12:44 PM

1 / 10
ह्युंदाईची उप कंपनी किया मोटर्स भारतातील पहिली वहिली कार सेल्टॉस लाँच आज लाँच करण्यात आली. यंदा भारतात दोन नवीन कंपन्यांनी प्रवेश केला आहे. यामध्ये एमजी मोटर्स आणि किया मोटर्स या कंपन्या आहेत.
2 / 10
ह्युंदाईची क्रेटा आणि कियाच्या सेल्टॉसमध्ये कमालीचे साम्य असून केवळ फिचर्स वेगळी देण्यात आली आहेत.
3 / 10
सेल्टॉसमध्ये 10.25 इंचाची इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे. किया दोन व्हर्जनमध्ये लाँच करण्यात आली आहे. Tech Line आणि GT Line. यामध्ये केबिनमध्ये किंचित फरक करण्यात आला आहे.
4 / 10
सेल्टॉसमध्ये तीन इंजिन प्रकार देण्यात आले आहेत. 1.4 लीटर जीडीआय टर्बो पेट्रोल, 1.5 लीटर पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. ही तिन्ही इंजिन बीएस-६ नियमावली पूर्ण करतात.
5 / 10
1.4 लीटर जीडीआय टर्बो पेट्रोल इंजिन 138 bhp आणि 242 Nm टॉर्क उत्पन्न करते. हे इंदिन 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 7 स्पीड DCT अॅटोमॅटीक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. हे इंजिन 0 ते 100 किमीचा वेग 9.7 सेकंदात घेते. तसेच 16.1 किमी प्रती लीटर मायलेज देते.
6 / 10
किया मोटर्सने 16 जुलैपासून बुकींग सुरू केले असून आतापर्यंत 23 हजारचा आकडा पार केला आहे. भारतात 160 शहरांमध्ये कंपनीने 192 डिलरशीप उघडल्या आहेत.
7 / 10
सेल्टॉस ६ एअरबॅग, एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलायझेशन कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, पार्किंग सेन्सर, ब्लाईंड स्पॉट व्ह्यू मॉनिटर सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. तसेच कार चालविण्यासाठी तीन मोड देण्यात आले आहेत. नॉर्मल, इको आणि स्पोर्ट मोड देण्यात आले आहेत. तर टेरेन मोडमध्ये वेट, मड आणि सँड असे मोड देण्यात आले आहेत.
8 / 10
कारमध्ये बोसची साऊंड सिस्टिम देण्यात आली आहे. तसेच 7 इंचाचा कलर डिस्प्लेचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे.
9 / 10
कारची किंमत 9.69 लाखांपासून सुरू होणार आहे.
10 / 10
सेल्टॉसचे डिझेलच्या अॅटोमॅटीक मॉडेलची किंमत 15.99 लाख रुपयांना एक्सशोरूम उपलब्ध होणार आहेत.
टॅग्स :Kia Motars Carsकिया मोटर्सHyundaiह्युंदाईcarकार