शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Kawasaki नं भारतात लाँच केली Supercool बाईक; पाहा किंती आहे किंमत आणि फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2022 5:20 PM

1 / 6
Kawasaki Z650 RS 50th Anniversary Edition : कावासाकीनं (Kawasaki) भारतात आपली एक जबरदस्त मोटरसायकल लाँच केली आहे. या बाईकचं नाव Kawasaki Z650 RS 50th Anniversary Edition असं ठेवण्यात आलं आहे. कंपनीनं या बाईकमध्ये युनिक पेंटचा वापर केला आहे. यामुळे ही बाईक अधिकच आकर्षक बनते.
2 / 6
Kawasaki स्पेशल एडिशनची किंमत 6.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही किंमत बाईक स्टँडर्ड बाईकच्या तुलनेत 5000 रुपयांनी अधिक आहे. कंपनीनं सध्य़ा या बाईकचं बुकिंग सुरू केलं असून भारतातील बाईक चाहत्यांना ती ऑर्डर करता येणार आहे.
3 / 6
यात युनिक पेंट स्कीम वापरण्यात आल्याचे कंपनीने जास्त किंमतीचे कारण दिले आहे. हे फायरक्रॅकर रेड आहे, जे 80 च्या दशकातील बाइकमध्ये देखील वापरले जात होते. नवीन बाईकमध्ये क्रोम कलर देखील उपलब्ध असेल.
4 / 6
स्टँडर्ड व्हर्जनप्रमाणेच या बाइकमध्ये 649 सीसी इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8000 rpm वर 67.3 bhp ची पॉवर जनरेट करू शकते.
5 / 6
तसेच, ते 6700 rpm वर 64 Nm टॉर्क निर्माण करू शकते. यात 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.
6 / 6
या मोटरसायकलमध्ये 41 मिमीच्या टेलिस्कोपिक फॉर्मचा वापर करण्यात आला आहे. यात 220 मिमीचा डिस्क ब्रेक आहे, तर पुढील बाजूस 300 मिमीचा डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.
टॅग्स :Kawasaki Bikeकावासाकी बाईकIndiaभारत