Bike Washing Tips: मोटरसायकल घरीच धुताय? या गोष्टींची काळजी घ्या, सांभाळा....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 11:38 AM2022-01-09T11:38:38+5:302022-01-09T11:43:03+5:30

Bike Washing Tips at home: तुम्ही गंमत म्हणून किवा काहीवेळा या चुका करत असालच. बाईक लवकर खराब होण्य़ापासून वाचविण्यासाठी त्या करू नका.

अनेकांना मोटरसायकलवरून रपेट मारणे आवडते. आजकाल प्रत्येकाच्या घरात दोन तीन मोटरस्याकल, स्कूटर असतातच. शहर असो की खेडे प्रत्येकाचे बाईक हे मुख्य साधन आहे. घरच्याघरी ही बाईक धुतली जाते. यामुळे तुमचे पैसे वाचत असतील. परंतू असे करताना काही सावधानता बाळगावी लागणार आहे. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.

तुम्ही गंमत म्हणून किवा काहीवेळा या चुका करत असालच. बाईक लवकर खराब होण्य़ापासून वाचविण्यासाठी त्या करू नका. बाईक धुताना एक्झॉस्ट पाईप म्हणजेच सायलेन्सरमध्ये पाणी भरू नये. कारण सायलेन्सरमध्ये पाणी गेले तर बाईक सुरु होण्यास त्रास होईल. यामुळे तुम्हाला बाईकला सारखी सारखी किक मारावी लागू शकते.

बाईकला मऊ कापडाने साफ करावे, कारण जर मऊ नसलेल्या कापडाने तुम्ही साफ करत असाल तर बाईकच्या बॉडीवर स्क्रॅचेस पडू शकतात. यामुळे बाईकचा रंगही खराब होऊ शकतो. खासकरून काळ्या रंगाला खूप मेन्टेन ठेवण्याची गरज आहे. रंगाची चमक हळूहळू जाते आणि बाईक खराब दिसू लागते.

बाईक धुत असताना नेहमी बाईक शाम्पूचा वापर करावा. अनेकजण केसांचा शाम्पू वापरतात. तो हार्ड असेल तर रंग खराब होऊ शकतो.

बाईक धुताना बाईकच्या की लॉकमध्ये पाणी जाऊ नये, अशा पद्धतीने धुवावी. अनेकदा की लॉकची झापड खराब होते. यामुळे त्यात पाणी जाण्याची शक्यता असते. किंवा जोरात त्या झापडवर पाणी मारले तरी त्या वेगाने पाणी आत जाण्याची शक्यता असते. यामुळे तिथे वेळोवेळी ऑईलिंग करावे म्हणजे पाणी जाऊन गाडी चालू बंद करण्यास त्रास येणार नाही.