शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Honda Scoopy: क्यूट लुक अन् आकर्षक डिझाईन...Honda ने लॉन्च केली जबरदस्त स्कूटर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 5:04 PM

1 / 5
जापानी टू-व्हिलर मेकर कंपनी होंडाने (Honda) नवीन स्कूटर Honda Scoopy लॉन्च केली आहे. अतिशय आकर्षक लुक आणि दमदार इंजिन असलेल्या या स्कूटरमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.
2 / 5
या स्कूटरचा लुक आणि डिझाईन खूपच आकर्षक असून, महिला आणि पुरुषांना लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. या स्कूटरच्या माध्यमातून तरुण ग्राहकांना टार्गेट करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
3 / 5
कंपनीने सध्या इंडोनेशियन बाजारात Honda Scoopy लाँच केली आहे. विशेष म्हणजे कंपनीने या नावाचे भारतीय बाजारपेठेतही पेटंट घेतले आहे, त्यामुळे नजीकच्या काळात ही भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
4 / 5
कशी Honda Scoopy? डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने याला फंकी लुक दिला आहे, जो आजच्या तरुणाईला खूप आवडतो. या स्कूटरला रेट्रो लुकसह आधुनिक वैशिष्ट्यांची जोड देऊन तयार करण्यात आले आहे. याला एक मोठा ओव्हल हेडलाइट, एलईडी लाइटिंग आणि लांब आसनासह एक चांगला फुल बोर्ड मिळतो. कंपनीचा दावा आहे की, या स्कूटरची पोझिशनिंग सिटी राईडसाठी योग्य आहे.
5 / 5
किंमत काय आहे? इंडोनेशियन बाजारात Honda Scoopy ची किंमत INR 2,16,53,00 निश्चित करण्यात आली आहे, जी भारतीय चलनात सुमारे INR 1.17 लाख असेल. कंपनीने गेल्या वर्षी भारतीय बाजारात या स्कूटरच्या नावाचे पेटंट घेतले होते. मात्र ही स्कूटर इथल्या मार्केटमध्ये कधी लॉन्च केली जाईल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
टॅग्स :HondaहोंडाAutomobileवाहनtwo wheelerटू व्हीलर