शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' व्यक्तीनं खरेदी केलेली Maruti ची पहिली कार, ३९ वर्षांनी कंपनीने घेतली परत; पाहा कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 1:22 PM

1 / 7
मारुती-सुझुकी आजकाल एकामागून एक अनेक कार्स लाँच करत आहे. अलीकडच्या काही महिन्यांत, नवीन ब्रेझापासून ग्रँड विटारापर्यंत कंपनीच्या कार्सना ग्राहकांनी पसंती दिली. कंपनी एसयूव्ही सेगमेंटमध्ये मजबूत पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
2 / 7
मारुती आज उत्तमोत्तम फीचर्स असलेल्या कार्सची विक्री करत आहे. त्याचे देशभरात लाखो ग्राहक आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का मारुतीच्या देशातील पहिल्या कारचे पहिले ग्राहक कोण होते? मारुतीची पहिली कार Maruti-800 चे पहिले खरेदीदार कोण होते?
3 / 7
मारुतीची पहिली कार 1983 मध्ये लाँच झाली होती. त्यावेळी Maruti-800 ची किंमत 47,500 रुपये (Maruti-800 Price) इतकी निश्चित करण्यात आली होती. त्याचे पहिले युनिट हरियाणात मारुती उद्योग लिमिटेडमध्ये बनवले गेले. हे आता मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड म्हणूनही ओळखले जाते. मारुतीची ही कार 2004 पर्यंत भारतात सर्वाधिक विकली जाणारी कार होती. मात्र, मारुती अल्टोची विक्री वाढवण्यासाठी कंपनीने 2010 मध्ये त्याचे उत्पादन बंद केले.
4 / 7
मारुती सुझुकीच्या हरियाणा प्लांटमधून बाहेर पडलेल्या पहिल्या 800 कारचे खरेदीदार नवी दिल्लीचे रहिवासी हरपाल सिंग होते. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना स्वतःच्या हाताने गाडीच्या चाव्या दिल्या होत्या. मारुतीची पहिली कार 800 2010 पर्यंत त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्या सोबत होती. या कारचा नोंदणी क्रमांक DIA 6479 होता. आता मारुतीचे हे पहिले युनिट कंपनीच्या मुख्यालयात (Maruti HQ) प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.
5 / 7
दिवंगत हरपाल सिंग यांची मारुती-800 कार पूर्णपणे खराब स्थितीत होती. या कारची काही छायाचित्रे इंटरनेटवर टाकण्यात आली होती. यानंतर कंपनीने कार रिस्टोअर करण्याचा निर्णय घेतला. कंपनीने कारमधील सर्व मूळ स्पेअर पार्ट्स आणि इक्विपमेंट्स पुन्हा एकत्र केली. मात्र, ही गाडी आता दिल्लीच्या रस्त्यावर धावण्यासारखी नाही. त्यामुळे कंपनीने भारतातील पहिली कार म्हणून आपल्या मुख्यालयात ठेवण्याचा निर्णय घेतला.
6 / 7
मारुतीने 1983 मध्ये आपली मारुती 800 कार भारतीय बाजारात लाँच केली होती. कंपनीने 800 मॉडेलची किंमत 47,500 रुपये ठेवली होती. त्या कारची ऑनरोड किंमत सुमारे 52,500 रुपये होती. या कारमध्ये 796cc पेट्रोल इंजिन देण्यात आले होते.
7 / 7
भारतातील मारुतीच्या कारखान्यातून बाहेर पडलेली पहिली कार मारुती 800 होती. सुमारे 20,000 लोकांनी कार बुक केली होती, परंतु लॉटरी ड्रॉद्वारे दिल्लीच्या हरपाल सिंग यांचे नाव पुढे आले होते. मारुती 800 ही भारतातील पहिली कार होती जी फ्रंट व्हील ड्राइव्हसह आली होती.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीIndira Gandhiइंदिरा गांधी