याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 14:42 IST
1 / 6टाटा मोटर्सने आपल्या इलेक्ट्रिक वाहनांवर नोव्हेंबर 2025 साठी आकर्षक सवलत देण्याची घोषणा केली आहे. या यादीत Curvv EV, Nexon EV, Punch EV आणि Tiago EV चा समावेश आहे. 2 / 6या ऑफर्समध्ये एक्स्चेंज, स्क्रॅपेज, कॉर्पोरेट डिस्काउंट आणि ग्रीन बोनसचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, जुन्या टाटा ग्राहकांना लॉयल्टी प्रोग्रॅमअंतर्गत अतिरिक्त लाभही मिळू शकतो.3 / 6Tata Curvv EV : टाटाची नव्या इलेक्ट्रिक SUV Curvv EV वर तब्बल १.३० लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिली जात आहे. यात एक लाख रुपयांचा ग्रीन बोनस आणि ३०,००० रुपयांपर्यंत एक्स्चेंज किंवा स्क्रॅपेज ऑफर आहे. Curvv EV ची एक्स-शोरूम किंमत १७.४९ लाख ते २२.२४ लाख रुपयां दरम्यान आहे. यात ४५kWh आणि ५५kWh अशा दोन बॅटरी पर्यायांसह ४३० आणि ५०२ किमीपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज मिळते.4 / 6Tata Tiago EV: टाटाची सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार म्हणजे Tiago EV. या कारवर एक लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट जाहीर करण्यात आला आहे. यात ७०,००० रुपयांपर्यंत ग्रीन बोनस आणि ३०,००० रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफर आहे. या कारची किंमत ७.९९ लाख ते ११.१४ लाख रुपयां दरम्यान आहे. १९.२kWh आणि २४kWh बॅटरी व्हेरियंट्ससह ही कार २२१ आणि २७५ किमीपर्यंतची रेंज देते.5 / 6Tata Punch EV: लोकप्रिय SUV Punch EV वरही एक लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट उपलब्ध आहे. यात ६०,००० रुपयांचा ग्रीन बोनस आणि ४०,००० रुपयांपर्यंत एक्स्चेंज किंवा स्क्रॅपेज ऑफरचा समावेश आहे. या मॉडेलची किंमत ९.९९ लाख ते १४.४४ लाख रुपये असून, यात २५kWh आणि ३५kWh बॅटरी पर्याय देण्यात आले आहेत, जे २१० आणि २९० किमीपर्यंत रेंज देते.6 / 6Tata Nexon EV: TATA Nexon EV चा विचार करता या EV वर सरवात कमी डिस्काउंट देण्यात आला आहे. या कारवर केवळ ३०,००० रुपयांपर्यंत एक्स्चेंज अथवा स्क्रॅपेज ऑफर देण्यात आली आहे. हिची किंमत १२.४९ लाख ते १७.४९ लाख रुपये आहे. ही कार ३०kWh आणि ४५kWh बॅटरींसह ही कार २७५ आणि ४८९ किमीपर्यंतची रेंज देते.