eBikeGo : पेट्रोलपेक्षा पाच पट कमी किंमतीत धावणार ही Electric Scooter; २० पैसे किमीपेक्षाही कमी खर्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 11:33 IST
1 / 10भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात भाड्यानं इलेक्ट्रिक वाहनं देणारी अग्रगण्य eBikeGo लवकरच बाजारात आपली नवीन 'Rugged' इलेक्ट्रिक स्कूटर सादर करणार आहे. कंपनीची ही बाईक 25 ऑगस्टला लाँच केली जाईल. कंपनीने सादर केलेला हा एक नवीन ब्रँड आहे.2 / 10भारतीय बाजारपेठेत सादर होणारे हे आतापर्यंतचे सर्वात मजबूत इलेक्ट्रिक वाहन असेल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. ही स्कूटर पूर्णपणे भारतातच डिझाईन आणि तयार केली गेली आहे.3 / 10इलेक्ट्रिक स्कूटरला ICAT ची मंजुरी मिळाली आहे आणि ती फेम II सबसिडी कार्यक्रमासाठी देखील पात्र आहे. 25 ऑगस्ट रोजी या स्कूटरचं अनावरण केले जाईल आणि सुरुवातीला कंपनी फक्त मर्यादित प्री-ऑर्डर घेईल.4 / 10eBikeGo चा दावा आहे की या नवीन वाहनाच्या निर्मितीपूर्वी मोठ्या प्रमाणात संशोधन करण्यात आलं आहे. कंपनीचे म्हणणे आहे की ते EBGmatics (eBikeGo च्या मालकीचे IoT तंत्रज्ञान) द्वारे गोळा केलेल्या लाखो डेटा पॉईंट्सचा वापर आणि विश्लेषण करून तयार केले गेले आहे. जे ग्राहकांच्या सर्व गरजा आणि उपयुक्ततेच्या आधारावर तयार केली गेली आहे.5 / 10'आम्ही एक मजबूत इलेक्ट्रिक वाहन तयार करण्यासाठी जवळपास तीन वर्षे वाट पाहिली आणि त्यानंतर आम्ही या दिशेने पुढे जाण्याचा निर्णय घेतला,' अशी माहिती कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इरफान खान यांनी दिली.6 / 10आम्हाला असं परवडणारे इलेक्ट्रिक वाहन बनवायचं आहे. जे सामान्य लोकं सहजपणे स्वीकारू शकतात, असं ते म्हणाले. 7 / 10eBikeGo ने नुकतेच जाहीर केले की ते देशातील पाच शहरांमध्ये 3,000 IoT सक्षम सार्वजनिक चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी काम करणार आहेत. ही चार्जिंग स्टेशन्स संबंधित शहरांमध्ये दुचाकी आणि तीन चाकी इलेक्ट्रिक वाहनं दोन्ही चार्ज करू शकतील. 8 / 10या चार्जिंग स्टेशन्सपर्यंत पोहोचण्यासाठी ती इंटरनेटशीही जोडली जातील. चार्जिंग स्टेशन वापरू इच्छिणाऱ्या ग्राहकांना केवळ QR कोड स्कॅन करणं आवश्यक आहे. 9 / 10BikeGo एक स्मार्टफोन अॅप्लिकेशनही देणार आहे. याचा वापर करून ग्राहकांना आपलं वाहन चार्ज करताना वापरण्यात आलेली युनिट्सही तपासून पाहता येतील.10 / 10या चार्जिंग स्टेशनवर UPI, डेबिट कार्ज किंवा रोख रक्कम देण्यासारखे पर्यायही उपलब्ध असतील. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार ही इलेक्ट्रीक स्कूटर चार्ज करण्यासाठी 20-25 पैसे प्रति किलोमीटरचा खर्च येणार आहे. पेट्रोल वाहनांच्या तुलनेत हे वाहन जवळपास पाच पट स्वस्त असेल.