शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातील सर्वांत सुरक्षित कार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची; कोणतेही शस्त्र भेदू शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 3:17 PM

1 / 11
जगातील सर्वात शक्तीशाली देश असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 24 फेब्रुवारीला भारतात येत आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये ते अहमदाबादला भेट देणार आहेत. तेथे त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे. सरदार पटेल स्टेडिअममध्ये लाखोंच्या समुदायाला ते संबोधित करणार आहेत. या वेळी त्यांच्या सुरक्षेचीही जबाबदारी गुजरात पोलिसांबरोबर अमेरिकेची सुरक्षा यंत्रणेवर आहे. आज त्यांच्या ताफ्यातील सर्वात सुरक्षित आणि शस्त्रास्त्रांनी सज्ज असेल्या अभेद्य कार अहमदाबादला पोहोचल्या आहेत.
2 / 11
अमेरिकेची सुरक्षा एजन्सी सीआयएने डोनाल्ड ट्रम्प यांचा मार्ग आणि कार्यक्रमस्थळाचा ताबा घेतला आहे. तब्बल 200 सुरक्षा अधिकारी रात्रीच मोठ्या विमानाने दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत ट्रम्प यांच्या कारचा ताफाही आहे. या दोन दिवसांच्या काळात अहमदाबादला नो फ्लाय झोन घोषित करण्यात येणार आहे.
3 / 11
ट्रम्प यांच्या जिवाला धोका उत्पन्न झाल्यास त्यांच्या ताफ्यातील अभेद्य कारच ट्रम्प यांचे संरक्षण करू शकणार आहे. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना ही कार केवळ रोखणारच नाही तर त्यांच्यासाठी कर्दनकाळच ठरणार आहे. ही कार केवळ बुलेटप्रूफच नाही तर भूसुरुंग विरोधी, मिसाईल, रासायनिक हल्ला परतवून लावणारी आहे.
4 / 11
ही शस्त्रास्त्रांनी युक्त असलेली लिमोझिन आहे. 2018 मध्ये ही कार त्यांच्या ताफ्यात आली होती. या कारला द बीस्ट असेही म्हटले जाते.
5 / 11
या लिमोझिनची बांधणीच अशी करण्यात आली आहे की, बॉम्ब स्फोट झाल्यास किंवा रॉकेट डागल्यास इंजिनलाही धक्का लागणार नाही. कोणत्याही परिस्थितीत ही कार बंद पडणार नसल्याची खबरदारी घेण्यात आलेली आहे. तसेच खिडक्यांच्या काचाही पॉलिकार्बोनेटच्या पाच थरांनी बनविलेल्या आहेत. त्या भेदणे अशक्य आहे. महत्वाचे म्हणजे या काचा जास्त उघडत नाहीत. केवळ तीन इंचच उघडचा येतात.
6 / 11
कारची बॉडी ही स्टील, टायटॅनिअम, अॅल्युमिनिअम आणि सिरॅमिकच्या मिश्रणातून बनविण्यात आलेले आहे. यामुळे रासायनिक, गॅस आणि आगीसारख्या हल्ल्यापासून कारचा बचाव होतो.
7 / 11
लिमोझिनचा पत्रा हा 8 इंच जाडीचा असून अतिशय कठीण अशा धातूपासून त्याची निर्मिती झाली आहे. या कारचा दरवाजा बोईंग विमानाच्या दरवाजाच्या वजनाचा आहे.
8 / 11
कारमध्ये चालकासाठी केबिन असते. त्यामुळे तो राष्ट्राध्यक्षांना पाहू शकत नाही. कारवर हल्ला झाल्यास त्याला प्रत्यूत्तर देण्यासाठीही टीअर गॅस, ग्रेनेड लाँचर, नाईट व्हिजन कॅमेरे, पॅनिक बटनवर ऑक्सिजनचा पुरवठा आदी ठेवण्यात आलेले आहे. तसेच आतमध्ये शॉटगन, तोफ, ब्लेड बॅग सारखी अत्याधुनिक शस्त्रेही आहेत.
9 / 11
ही कार लांबीला मोठी असली तरीही ती कोणत्याही वेगात 180 च्या कोणामध्ये वळू शकते. इंधनाची टाकीही खूप सुरक्षित आहे.
10 / 11
महत्वाचे म्हणजे ट्रम्प यांचे विमान कधीच बंद केले जात नाही. ट्रम्प विमान उभे असल्यापासून कित्येक किमी लांब असले तरीही हे विमान 24 तास सुरूच असते. य़ा विमानाच्या भोवतालीही कडक सुरक्षा तैनात असते. हे अशासाठी की जर त्यांच्यावर हल्ला झाला तर तातडीने तिथून निघून जाता यावे.
11 / 11
अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांसाठी खास अशी कार पहिल्यांदा 1910 मध्ये बनवून घेण्यात आली होती. ही कार नंतरचे राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हाऊवर यांनी बदलली आणि कॅडिलॅक कंपनीची कार ताफ्यात घेतली.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातAmericaअमेरिका