लॉकडाऊननंतर तुमच्या कारने मेन्टेनन्सला नाही दमवले म्हणजे मिळवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 19:19 IST
1 / 11सर्वात आधी कारची बॅटरी उतरू न देणे. यासाठी कारच्या हेडलाईट बंद केलेल्या आहेत का याची चाचपणी करा. चावी लावलेली नाही ना याचीही खात्री करा. तसेच अन्य अॅक्सेसरीज जसे की, मोबाईल चार्जर डिस्कनेक्ट करा. 2 / 11पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशभरातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे. यामुळे जवळपास सलग 40 दिवस लोकांना घरातच रहावे लागणार आहे. 3 / 11म्हणजेच तुमचे वाहन, कार तुम्ही बाहेर नेऊ शकणार नाहीत. हे खूप धोक्याचे आहे. कोरोनापासून सावध राहताना वाहनाचीही या काळात काळजी घेणे गरजेचे आहे. 4 / 11पुढील महिन्यापर्यंत लॉकडाऊन असल्याने तुमची कार एकाच जागी उभी असणार आहे. कडक उन्हाळा, धूळ यामुळे गाडीचा मेन्टेनन्सही वाढण्याची शक्यता आहे. 5 / 11लॉकडाऊन संपल्यानंतर मे महिन्याची सुटी असल्याने सहाजिकच लोक घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. यामुळे या कारची काळजी घ्यावी लागणार आहे. आम्ही तुम्हाला याबाबत सांगणार आहोत. 6 / 11इमारतीखाली कव्हर्ड पार्किंग असेल तर ठीक नाहीतर कारवर कापडी कव्हर टाकून झाकून ठेवा. 7 / 11तुमच्या कारचा एसी रिसक्युलेशन मोडवर ठेवा आणि एसीचे बटन बंद करा. 8 / 11मोठ्या काळासाठी कार एकाच जागी असल्याने हँड ब्रेक लावू नका. त्या ऐवजी टायर स्ट़ॉपर्स किंवा लाकडी ठोकळ्यांचा वापर करावा. 9 / 11उन्हामुळे काच खूप तापते. यामुळे वायपरवरील रबरचे ब्लेड खराब होण्याची शक्यता असते. यासाठी वायपर वर उचलून ठेवा.10 / 11दर आठवड्याभराने कार थोडी मागे-पुढे करावी. अन्यथा कारच्या टायरना फ्लॅट स्पॉट पडतील. जे तुमचे मायलेज आणि टायरच्या झीजेबरोबर जीवही धोक्यात घालू शकतात. 11 / 11तीन दिवसांतून एकदा कार सुरु करून इंजिन किमान १५ मिनिटांसाठी सुरु ठेवा. जोखमीच्या जागी असाल तर हे करणे धोक्याचे ठरेल.