शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जुन्या कारमध्ये CNG किट फिट करायचाय; तर 'या' गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 4:29 PM

1 / 8
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) दरानं उच्चांक गाठला आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे लोक अन्य पर्यायांच्या शोधात आहेत. इलेक्ट्रीक गाड्या हा पर्याय सध्या उपलब्ध होत असला, तर तुलनेनं त्या महाग असल्यानं अनेकांच्या त्या अवाक्याबाहेर आहेत.
2 / 8
त्यामुळे आता बहुतांश लोक सीएनजी आणि एलपीजी किटही वापरत दिसतायत. हे पाहता सीएनजी कारच्या मागणीतही लक्षणीय वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी स्वस्तही असल्यानं अनेक जण तो पर्याय स्वीकारताना दिसतायत.
3 / 8
अनेक कंपन्या त्यांच्या वाहनांमध्ये फॅक्टरी फिटेड सीएनजी किटचा पर्याय देत आहेत. तर दुसरीकडे अनेक लोक आता त्यांच्या जुन्या कारमध्ये सीएनजी आणि एलपीजी किट बसवण्याचा पर्यायही पाहत आहेत. तुम्हीही तुमच्या जुन्या कारमध्ये सीएनजी बसवण्याचा विचार करत असाल, तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्याकडे दुर्लक्ष केल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.
4 / 8
जेव्हा तुम्ही तुमच्या कोणत्याही नॉन-सीएनजी कारमध्ये सीएनसी किट बसवण्याचा विचार करत असाल, तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही कारचे फ्युअल टेक्नॉलॉजीदेखील बदलली पाहिजे. यामुळे कारच्या विमा पॉलिसीमध्ये मोठा फरक पडतो. याकडे दुर्लक्ष केल्यास तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.
5 / 8
अशा परिस्थितीत सीएनजी किट किंवा एलपीजी किट लावण्यापूर्वी वाहनाच्या राज्या परिवहन विभागानं जारी केलेल्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटसाठी अर्ज केला पाहिजे. तसंच यामध्ये पेट्रोल डिझेलच्या जागी सीएनजीचा ऑप्शन निवडला पाहिजे.
6 / 8
यासह, तुम्हाला आरसी बुक, विमा पॉलिसीची प्रत, एलपीजी-सीएनजी किट चालान आणि कारचे केवायसी यांसारखी कागदपत्रे आरटीओ कार्यालयात जमा करावी लागतील. फॉर्म भरल्यानंतर, आरटीओद्वारे कागदपत्रांची छाननी केली जाते आणि रेट्रो फिटिंगला मान्यता दिली जाते.
7 / 8
वाहन नोंदणी प्रमाणपत्रासोबत वाहन विम्याचीही पुष्टी करावी लागते. हे काम विमा कंपनी करते. एलपीजी-सीएनजी किट इनव्हॉइस, आरसी बुक आणि सर्व कागदपत्रे विमा कंपनी तपासून पाहते. यानंतर विमा पॉलिसी कारच्या मालकाकडे पाठवली जाते.
8 / 8
जर तुम्ही तुमच्या इंधन तंत्रज्ञानाबद्दल विमा कंपनीला माहिती दिली नाही, तर तुमच्या कारचा अपघात झाल्यास कंपनी तुम्हाला क्लेम देण्यास नकार देऊ शकते. याचे कारण म्हणजे, पेट्रोल आणि डिझेल कारच्या तुलनेत सीएनजी कारमध्ये जोखीम अधिक असते.
टॅग्स :carकारRto officeआरटीओ ऑफीस