4 वर्षांहून अधिक वयाच्या लहानग्यांना आता हेल्मेटसक्ती; जाचक नियमांचा वाहनचालकांवर भडिमार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 16:36 IST
1 / 6रस्ते अपघात रोखण्यासाठी सरकारनं मोटर वाहन(संशोधन) विधेयक 2019ला मंजुरी दिली आहे. राज्यसभेत या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानं आता वाहन चालकांना या जाचक नियमांचा सामना करावा लागणार आहे. 2 / 6एखाद्या अल्पवयीन मुलाला गाडी चालवताना वाहतूक पोलिसांनी पकडल्यास वाहनाच्या मालकांला तुरुंगवास ठोठावला जाणार आहे. त्या गाडीच्या मालकाला 25 हजार रुपये दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास ठोठावला जाणार आहे. 3 / 6दारू पिऊन गाडी चालवल्यास आतापर्यंत दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला जात होता. आता त्यासाठी 10 हजार रुपयांपर्यंतचा दंड वसूल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. 4 / 6रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांकडून हजार रुपयांचा दंड वसूल केला जात होता, आता तो हजार रुपयांचा दंड 5 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. 5 / 6गाडी चालवताना फोनवर बोलणंही आता महागात पडू शकते. गाडी चालवत असताना फोनवर बोलल्यास आधी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला जात होता. तोच आता वाढवून 5 हजार रुपये करण्यात आला आहे. 6 / 6 सीट बेल्ट न वापरल्यास मोठा भुर्दंड द्यावा लागणार आहे. सीट बेल्ट लावलेला नसल्यास आधी 100 रुपये दंड द्यावा लागत होता. आता तोच दंड एक हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे.