नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 13:06 IST
1 / 7 गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची चर्चा सुरू होती, ती Tesla ची RoboTaxi सेवा अखेर सुरू झाली आहे. स्वतः कंपनीचे CEO इलॉन मस्क(Elon Musk) यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याची घोषणा केली आहे. याची सुरुवात ऑस्टिनमध्ये झाली असून, पहिल्या प्रवासाचे शुल्क 4.20 अमेरिकन डॉलर (अंदाजे 364 रुपये) आहे.2 / 7टेस्लाची रोबो टॅक्सी एक ड्रायव्हरलेस टॅक्सी आहे. या कारमध्ये पूर्ण सेल्फ-ड्रायव्हिंग (FSD) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याच्या मदतीने ही टॅक्सी ड्रायव्हरशिवाय चालते. रविवारी सकाळी ऑस्टिनमध्ये अनेक ठिकाणी या टॅक्सी धावताना दिसल्या. 3 / 7ड्रायव्हरशिवाय गाडी चालताना पाहून अनेकजण चकीत झाले. या लॉन्चिंगदरम्यान कंपनीने अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित केले आणि त्यांना त्यात प्रवास करण्यास सांगितले.4 / 7ऑस्टिनच्या रस्त्यांवर सुमारे 10-20 टेस्ला रोबोटॅक्सी लॉन्च करण्यात आल्या आहेत. या टॅक्सींबद्दल सर्वात खास गोष्ट म्हणजे, त्या ड्रायव्हरशिवाय काम करतात. कंपनीने यापूर्वीच यासाठी मान्यता मिळवली आहे.5 / 7रोबोटॅक्सी सिस्टीम अशा प्रकारे काम करते? टेस्लाने त्यांच्या कार सिस्टीममध्ये काही विशेष सेन्सर, कॅमेरे आणि हार्डवेअर वापरले आहेत. यामध्ये कॅमेरा, न्यूरल नेटवर्क आणि ऑटोपायलट हार्डवेअर वापरले गेले आहेत. एफएसडी सिस्टीम या सर्वांसह एकत्रितपणे काम करते आणि सुरक्षिततेची हमी देते.6 / 7नेव्हिगेशन सिस्टीम स्वयंचलितपणे काम करते- टेस्ला रोबोटॅक्सीमध्ये नेव्हिगेशनसाठी एआय सिस्टम आहे. टेस्लाचे एआय लेन बदलण्यास, वळणे घेण्यास, ट्रॅफिक लाइट्सवर थांबण्यास आणि पार्किंग स्पॉट्स ओळखण्यास मदत करते.7 / 7वाहतुकीची पद्धत बदलेल का? टेस्ला रोबोटॅक्सीच्या आगमनानंतर वाहतुकीच्या जगात क्रांती आणू शकेल का? असा प्रश्न विचारला जातोय. भारतासह जगभरातील टॅक्सी किंवा वाहतुकीतील सर्वात मोठी चिंता सुरक्षिततेची आहे. जर ऑस्टिनमध्ये रोबोटॅक्सीचे ऑपरेशन यशस्वी झाले, तर जगातील इतर देश देखील त्याचे अनुसरण करू शकतात.