शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Car Accessories: समर स्पेशल टॉप-10 कार अॅक्सेसरीज; उन्हाळ्यातही कार राहील 'सुपरकूल', पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 5:36 PM

1 / 11
Top-10 Car Accessories For Summers: उन्हाळा सुरू झाला आहे संपूर्ण भारतात उन्हाच्या तीव्र झळ्या लागत आहेत. अशा परिस्थितीत दररोज कारमध्ये प्रवास करणाऱ्यांचे खूप हाल होतात. उन्हात कार प्रचंड तापते. पण, अशी काही अॅक्सेसरीज आहेत, ज्याद्वारे तुम्ही कार थंड ठेवू शकता. आम्ही तुम्हाला काही कार अॅक्सेसरीजबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर तुम्ही तुमच्या कारमध्ये करू शकता.
2 / 11
विंडस्क्रीन सनशेड्स: हे कारच्या विंडस्क्रीनवर पडणारा सूर्यप्रकाश रोखतात, ज्यामुळे कारमधील तापमान कमी ठेवण्यास मदत होते.
3 / 11
विंडो सनशेड्स (खिडकीचे पडदे किंवा खिडक्यांच्या सनशेड्स): हे खिडक्यांमधून कारच्या आत येणारा सूर्यप्रकाश रोखण्यासाठी वापरतात.
4 / 11
डॅशबोर्ड कव्हर: हे तुमच्या डॅशबोर्डचे सूर्याच्या उष्णतेपासून संरक्षण करते. डॅशबोर्डच्या वर ठेवल्याने डॅशबोर्ड थंड राहतो.
5 / 11
स्टीयरिंग व्हील कव्हर: हे नेहमी वापरले जाऊ शकते. यामुळे स्टीयरिंग थंड राहते, तसेच स्टीयरिंग व्हीलवर पकडही चांगली ठेवता येते.
6 / 11
कार अंब्रेला: यामुळे कारच्या आत येणारा सूर्यप्रकाश रोखला जातो, ज्यामुळे कारमधील तापमान कमी राहते.
7 / 11
विंडो वायजर्स: हे लावल्यानंतर तुम्ही कारचे काच उघडे ठेवू शकता. यामुळे कारमध्ये वेंटिलेशन चालू राहते.
8 / 11
कूलिंग कुशन किंवा कूलिंग सीट कव्हर: हे तुमची पाठ आणि सीटमध्ये अंतर ठेवते, ज्यामुळे तुम्हाला जास्त घाम येत नाही.
9 / 11
सोलर फॅन: हे अतिरिक्त फॅन म्हणून कारमध्ये वापरता येतात. यामुळे काही प्रमाणात कार थंड राहते.
10 / 11
कार फ्रिज: कार फ्रिज थंड पेय किंवा पाणी इत्यादी थंड करण्यासाठी चांगले आहे. उन्हाळ्यात त्याची खूप गरज असते.
11 / 11
एसी व्हेंट कप होल्डर: ही एक मजेशीर अॅक्सेसरी आहे. ही एसी व्हेंटवर ठेवल्यानंतर तुमच्या कपमधील पेय थंड राहते.
टॅग्स :carकारAutomobileवाहनSummer Specialसमर स्पेशल