या आहेत भारतातील 10 सर्वात सुरक्षित कार; Bharat NCAP कडून मिळाले 5 स्टार रेटिंग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 16:03 IST
1 / 11Bharat NCAP Safety Rating: भारतात गेल्या काही वर्षांपासून कार खरेदीवर ग्राहकांचा भर वाढला आहे. खासकरुन सुरक्षित कार खरेदी करण्याबाबत लोकांमध्ये बरीच जागृकता दिसून येत आहे. यामुळे ऑटो कंपन्यादेखील अधिकाधिक सुरक्षित कार बनवण्यावर भर देत आहेत. याशिवाय, कंपन्या स्वतंत्रपणे आपल्या कार क्रॅश टेस्टसाठी पाठवत आहेत. पूर्वी ग्लोबल NCAP द्वारे कारची क्रॅश चाचणी केली जात होती. पण, भारताने 23 ऑगस्ट 2023 रोजी भारत NCAP सुरू केले. यानंतर आता याद्वारे वाहनांना सुरक्षा रेटिंग देण्यात येत आहे. आम्ही तुम्हाला अशा काही कार्सबद्दल सांगणार आहोत, ज्याला भारत NCAP कडून 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. तुम्ही सुरक्षित कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तरया यादीतून कोणतेही मॉडेल निवडू शकता.2 / 11Skoda Kylaq- ही एक कॉम्पॅक्ट एसयूवी सेगमेंटची कार आहे. गेल्या वर्षी ही कार लॉन्च झाली होती. Bharat NCAP ने या कारला 5 स्टार रेटिंग दिली आहे. अडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शनमध्ये याला 32 पैकी 30.88 आणि चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनमध्ये 49 पैकी 45 पॉइंट्स मिळाले आहेत.3 / 11Mahindra XEV 9e- Bharat NCAP ने या कारला 5 स्टार रेटिंग दिली आहे. अडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शनमध्ये 32 आणि चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनमध्ये 49 पैकी 45 गुण मिळाले आहेत. 4 / 11Mahindra BE 6- महिंद्राच्या आणखी एका कारला भारत NCAP कडून 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. ही कार नुकतीच लॉन्च करण्यात आली. या कारला अडल्टमध्ये 32 पैकी 31.97 गुण आणि चाइल्ड सेफ्टीमध्ये 49 पैकी 45 गुण मिळाले आहेत.5 / 11Hyundai Tucson- या कारला 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. अडल्ट सेफ्टीसाठी 32 पैकी 30.84 गुण आणि चाइल्डसाठी 49 पैकी 41 गुण आहेत.6 / 11Mahindra Thar Roxx- महिंद्राच्या नवीन थारला भारत NCAP कडून 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. नवीन रेटिंगनुसार, थार रॉक्सला अडल्ट सेफ्टीसाठी 32 पैकी 31.09 गुण आणि चाइल्ड सेफ्टीसाठी 49 पैकी 45 गुण मिळाले आहेत.7 / 11Mahindra XUV 400 EV- या कारला अडल्टमध्ये 32 पैकी 30 पॉइंट्स आणि चाइल्डमध्ये 43.00/49.00 पॉइंट्स मिळाले आहेत. भारत NCAP कडून महिंद्राच्या अनेक कारना 5 स्टार रेटिंग मिळाले आहे.8 / 11Mahindra XUV 3XO- ही कारही महिंद्राने गेल्या वर्षी लॉन्च केली होती. या कारला अडल्टमध्ये 29.36/32.00 गुण आणि चाइल्डमध्ये 43.00/49.00 गुण मिळाले आहेत.9 / 11Tata Curvv EV- ही कार गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आली होती. याला 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. या कारला अडल्टमध्ये 30.81 पॉइंट्स आणि चाइल्डमध्ये 44.83 पॉइंट मिळाले आहेत.10 / 11Tata Nexon- टाटा नेक्सॉन कंपनीची लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. या कारला अडल्टमध्ये 29.41 / 32.00 पॉइंट्स आणि चाइल्डमध्ये 43.83/ 49.00 पॉइंट्स मिळाले आहे. 11 / 11Tata Punch.ev- टाटाच्या पंच EV लादेखील 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. अडल्टमध्ये 31.46/32.00 गुण आणि चाइल्डसाठी 45.00/49.00 गुण मिळाले आहेत. याशिवाय टाटा सफारी/हॅरियर आणि टाटा कर्व्ह, टाटा नेक्सॉन.इव्ही यांनादेखील 5 स्टार रेटिंग मिळाले आहे.