शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 14:02 IST

1 / 6
Bajaj Avenger Street 220 Features: बजाज अॅव्हेंजर बाईकच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. बजाज ऑटो त्यांची पॉवरफूल क्रूझर बाईक अ‍ॅव्हेंजरचे नवीन मॉडेल (Bajaj Avenger Street 220 ) लॉन्च करणार आहे. हे नवीन मॉडेल Avenger Cruise 220 च्या खालचे असेल, जेणेकरुन सामान्य वर्गातील ग्राहकांना ते परवडणाऱ्या किमतीत मिळू शकेल.
2 / 6
बजाज ऑटोची नवीन Avenger Street 220 पुन्हा एकदा क्रूझर बाईक प्रेमींच्या मनावर राज्य करण्यास सज्ज आहे. Avenger Cruise 220 च्या तुलनेत ही बाईक काही कॉस्मेटिक बदलांसह लॉन्च केली जाईल, जेणेकरून तिला अधिक शहरी आणि स्पोर्टी अपील देता येईल.
3 / 6
डिझाइन आणि फिचर्स-डिझाइन आणि फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर, स्ट्रीट 220 ला लांब विंडशील्डऐवजी लहान किंवा कोणताही कव्हर दिला जाऊ शकतो, ज्यामुळे तिचा लूक अधिक कॉम्पॅक्ट बनेल. बाईकचा लो-स्लंग स्टांस चांगला रायडिंग एक्सपेरियन्स देईल, तर फ्लॅट हँडलबार शहरी रस्त्यांवर गाडी चालवण्यास अधिक आरामदायी बनवेल. याशिवाय, ब्लॅक-आउट फिनिशिंग आणि एलईडी डीआरएल सारखे फीचर्सदेखील त्यात मिळण्याची अपेक्षा आहे.
4 / 6
इंजिन आणि परफॉर्मन्स- इंजिन आणि परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाले तर, त्यात अ‍ॅव्हेंजर क्रूझ 220 मध्ये असलेले 220 सीसी सिंगल-सिलिंडर ऑइल-कूल्ड एसओएचसी इंजिन दिले जाईल. हे इंजिन 19.09 पीएसची कमाल पॉवर आणि 17.55 एनएम टॉर्क जनरेट करते. यात 5 स्पीड गिअरबॉक्स आणि ऑइल कूलिंग सिस्टम देखील मिळेल, ज्यामुळे हीबाईक लांब राईड्स आणि दैनंदिन प्रवासासाठी विश्वसनीय बनते.
5 / 6
किंमत किती असेल? किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, बजाज अ‍ॅव्हेंजर स्ट्रीट 220, क्रूझ 220 पेक्षा थोडी स्वस्त असू शकते. क्रूझ 220 ची सध्याची एक्स-शोरूम किंमत 1.48 लाख रुपये आहे, तर स्ट्रीट 220 ची अपेक्षित किंमत 1.35 लाख ते 1.40 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असू शकते. या किमतीत, ही बाईक टीव्हीएस रोनिन, कावासाकी डब्ल्यू175 आणि रॉयल एनफील्ड हंटर 350 सारख्या बाईक्सना कडक स्पर्धा देऊ शकते.
6 / 6
विक्रीच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, एप्रिल 2025 मध्ये बजाज अ‍ॅव्हेंजर सीरिजच्या केवळ 1000 युनिट्स विकल्या गेल्या, ज्यामध्ये वर्षानुवर्षे 46% घट झाली आहे. अशा परिस्थितीत, अ‍ॅव्हेंजर स्ट्रीट 220 रि-लॉन्च केल्याने ब्रँडला नवीन उर्जा मिळू शकते आणि या विभागात कंपनीची उपस्थिती पुन्हा मजबूत होऊ शकते. एकूणच, बजाज अ‍ॅव्हेंजर स्ट्रीट 220 ही क्रूझर बाईक स्टाइल, परफॉर्मन्स आणि किंमत संतुलित करून ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.
टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलbikeबाईकAutomobile Industryवाहन उद्योग