शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आकाश अंबानी यांनी घेतली 10 कोटींची आलिशान Ferrari; पाहा फिचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 15:02 IST

1 / 5
Akash Ambani Ferrari Purosangue SUV Worth More Than 10 Crore: भारतात जेव्हा लक्झरी कार कलेक्शनची चर्चा सुरू होते, तेव्हा अंबानी कुटुंबाचे नाव सर्वात आधी येते. मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, रोल्स रॉयस...अंबानी कुटुंबाकडे एकापेक्षा एक आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे. आता रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष आणि मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी तब्बल 10 कोटी रुपयांची गाडी चालवताना स्पॉट झाला.
2 / 5
आकाश अंबानीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, ज्यात तो फेरारी पुरोसंग(Ferrari Purosangue) कार चालवताना दिसतो. या कारची खास गोष्ट म्हणजे, ती भारतात मोजक्या लोकांकडेच आहे. यापैकी 2 गाड्या अंबानी कुटुंबाच्या मालकीच्या आहेत. या गाडीची भारतात किंमत 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
3 / 5
कारमध्ये काय फीचर्स मिळतात? आकाश अंबानी जी कार चालवत होते, ती लाल रंगाची फेरारी पुरोसंगं आहे. या फेरारीत उच्च-कार्यक्षमता असलेले V12 इंजिन मिळते. या इंजिनमुळे कार प्रचंड पॉवरफुल बनली आहे. विशेष म्हणजे, फेरारी पुरोसंग एसयूव्ही ही कंपनीची पहिली एसयूव्ही आहे, जी फेब्रुवारी 2024 मध्ये भारतात लॉन्च झाली होती.
4 / 5
किंमत किती ? या एसयूव्हीची किंमत 10 कोटी 50 लाख रुपय(एक्स-शोरूम) पासून सुरू होते. कारच्या डिझाइन हायलाइट्सबद्दल बोलायचे झाले तर, फेरारी पुरोसंग एसयूव्हीमध्ये सिग्नेचर स्टाइलिंग उपलब्ध आहे. या फेरारीमध्ये लांब बोनेट आणि उतार असलेले रुफटॉप आहे. या फेरारीची खास गोष्ट म्हणजे त्याची एरोब्रिज डिझाइन, जी F12 बर्लिनेटा सारखीच आहे. कारचे डिझाईन याला आणखी सुंदर बनवते.
5 / 5
कारचा टॉप स्पीड फेरारीच्या पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाले तर, फेरारी पुरोसंग एसयूव्हीमध्ये 6.5 लिटर व्ही12 पेट्रोल इंजिन आहे, जे 725 एचपी पॉवर आणि 716 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही एसयूव्ही फक्त 3.3 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग गाठते. याशिवाय, कारचा टॉप स्पीड 310 किमी/तास पेक्षा जास्त आहे.
टॅग्स :FerrariफेरारीAkash Ambaniआकाश अंबानीAutomobileवाहन