Honda ची आणखी एक पॉवरफुल अॅडव्हेन्चर बाईक लाँच; पाहा फीचर्स आणि किंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 18:01 IST
1 / 9Honda मोटरसायकल अँड स्कूटर इंडियानं गुरूवारी आपली नवी CB200X ही बाईक लाँच केली. अनेक बाईक लव्हर्स Honda च्या या अॅडव्हेन्चर बाईकच्या प्रतीक्षेत होते. 2 / 9होडा CB200X बाईक हॉर्नेट 2.0 वरच बेस्ड आहे. जर स्टायलिंग बाबत सांगायचं झालं तर CB200X बाईनं CB500X या बाईकपासून इनपुट्स घेतले आहेत.3 / 9Honda CB200X बाईकच्या हेडलँपचं डिझाईन हॉर्नेटशी मिळतंजुळतं आहे. तसंच टॉल ब्लॅक विंडस्क्रीन आणि फ्युअल टॅकशी जोडणारा अँग्युलर पॅनल Honda CB500X या बाईकप्रमाणे असल्याचं दिसून येत आहे.4 / 9बाईकमध्ये LED टर्न इंडिकेटर्ससोबत एलईडी लायटिंग सेटअप देण्यात आलं आहे. फुली डिजिटल इंन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये बाईकच्या बाबातीत संपूर्ण माहिती येते. 5 / 9या बाईकचं बुकिंग सध्या सुरू करण्यात आलं असून, सप्टेंबर २०२१ पासून ही बाॉईक ग्राहकांना डिलिव्हर केली जाणार आहे. 6 / 9Honda CB200X या बाईकमध्ये 184CC सिंगल सिलिंडर एअर कुल्ड इंजिन देण्यात आलं आहे. हेच इंजिन Hornet मध्येही देण्यात आलं आहे. 7 / 9बाईकमध्ये देण्यात आलेलं हे इंजिन 8500rpm वर 17.03bhp ची पॉवर आणि 6000 rpm वर 16.1Nm चा टॉर्क जनरेट करतं. या बाईकमध्ये 17 इंचाचे अलॉय व्हिल्सही देण्यात आलेत आहेत.8 / 9बाईकमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. या इंजिनमध्ये 8 ऑन बोर्ड सेन्सर्ससोबत होंडा प्रोग्राम्ड फ्युअल इंजेक्शन देण्यात आलं आहे. तसंच यात सिंगल चॅनल ABS, फ्रन्ट आणि रिअर पेटल डिस्क ब्रेकही देण्यात आले आहेत.9 / 9Honda च्या या नव्या स्मॉल साईज स्ट्रीट आणि टुरिंग बाईकची एक्स शोरूम किंमत 1,44,500 रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. CB200X ही बाईक हॉर्नेट 2.0 पेक्षा जवळपास 13000 रूपये महाग आहे.