शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रोहित पवारांच्या मतदारसंघात वाटल्या तब्बल १० हजार सायकली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 5:12 PM

1 / 10
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रश्नांसाठी कायम आग्रही असतात. आपल्या मतदारसंघात अधिकाधिक निधी नेण्यासाठी प्रयत्नशील असतात.
2 / 10
मतदारसंघातील विविध विषय घेऊन ते सातत्याने मंत्रालयात किंवा संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांच्या कार्यालयातही भेटी-गाठी घेताना दिसून येतात. तसेच, मतदारसंघातही त्यांचा वावर असतो.
3 / 10
आता, मतदारसंघातील शाळकरी मुलांसाठी रोहित पवार यांनी स्तुत्य उपक्रम राबवलाय. तो म्हणजे शाळेतील मुलांना घर ते शाळा जाण्यासाठी तब्बल १० हजार सायकलींचे वाटप केलंय.
4 / 10
आपल्या राज्याचं आणि देशाचं भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत असताना, लोकप्रतिनिधी म्हणून कायमच समाधान मिळतं.
5 / 10
काल रविवारी झालेल्या सायकल वितरण सोहळ्यात याच विद्यार्थ्यांनी आपल्या निरागस भावना व्यक्त करून शाळेत जाण्यासाठी सायकल उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले, असे रोहित पवार यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे.
6 / 10
रोहित पवार यांच्या मतदारसंघातील तरुणांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासमवेत बाईक रॅली काढून स्वागत करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
7 / 10
त्यानुसार, अजित पवार यांच्या नेतृत्त्वात बाईक रॅली काढण्यात आली. त्यामध्ये, रोहित पवार हेही सहभागी झाले, उत्साहाने आणि जल्लोषात दादांचं माझ्या मतदारसंघात स्वागत केलं, असं रोहित पवार यांनी म्हटलं.
8 / 10
कर्जत-जामखेड मतदारसंघातील ५वी ते १०वीत शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांची शाळेत येण्या-जाण्याची सोय व्हावी व त्यांचा वेळ वाचावा. या उद्देशाने मतदारसंघात तब्बल १० हजार सायकली वाटण्यात आल्या.
9 / 10
बारामती ऍग्रो आणि KJIDF च्या माध्यमातून शालेय सायकल बँक करण्यात आली असून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याहस्ते १०,००० सायकलचे वितरण करण्यात आले.
10 / 10
या माध्यमातून १०००० शालेय विद्यार्थ्यांना मदत होणार आहे. सुरुवातीला ३ किमी पेक्षा अधिक अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना या सायकल देण्यात येत असून येत्या काळात आणखी सायकल देण्यात येतील, असेही रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सांगितले.
टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसCyclingसायकलिंगAjit Pawarअजित पवार