शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अश्लील भाषेत बोलत विद्यार्थिनींना शिक्षकाची विनाकारण मारहाण; मुलींनी तक्रारीचा पाढाच वाचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 18:35 IST

पोलिसांच्या निर्भया पथकामुळे झाला उलगडा; या प्रकरणी संबंधित शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल

- सत्यशील धबडगे मानवत: आठवी वर्गातील विद्यार्थिनींना रोज अश्लील भाषेचा वापर करून शिक्षक विनाकारण मारहाण करत असल्याची संतापजनक घटना शहरातील जिल्हा परिषद शाळेत उघडकीस आली आहे. या प्रकरणी ४५ वर्षीय शिक्षक दत्ता गंगाधर होगे याच्या विरोधात मानवत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचे निर्भया पथक शाळेत तपासणीसाठी आले असता त्यांच्यासमोर विद्यार्थिनींनी मोकळा संवाद साधत शिक्षकाच्या तक्रारींचा पाढा वाचल्याने हा प्रकार सर्वांच्या समोर आला.

शहरातील मोंढा परिसरात गटशिक्षणाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हा परिषद प्रशाळा आहे. शाळेत निर्भया पथकातील पोलिस कर्मचारी भेट घेऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी तक्रार पेटी बसविण्यात आली आहे. मंगळवारी (ता.१ ) पोलिस कर्मचाऱ्यांनी तक्रार पेटी उघडली असता त्यात, शिक्षक दत्ता गंगाधर होगे हा विद्यार्थिनींना अश्लील भाषेचा वापरून विनाकारण रोज छडीने मारहाण करीत असल्याच्या तक्रारीच्या सहा चिठ्या आढळून आल्या. याबाबत पडताळणी करण्यासाठी निर्भया पथकाने विद्यार्थिनींना भेटून विश्वासात घेत चर्चा केली. यात शिक्षक होगे हा मागील पंधरा दिवसांपासून विद्यार्थिनींना अश्लील भाषेचा वापर करून मारहाण करीत असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी मुख्याध्यापिका छाया गायकवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निर्भया पथकाने बजावली महत्वपूर्ण भूमिका एक ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता निर्भया पथकाने महिला पोलीस कर्मचारी शकुंतला चांदीवाले आणि पोलीस हवालदार सय्यद फय्याज यांनी इयत्ता आठवीच्या वर्गाला भेट दिली असता विद्यार्थी विद्यार्थिनींनी तक्रार पेटी उघडण्याची  विनंती निर्भया पथकाला केली. उपस्थित शिक्षिका, शिपाई यांच्या समक्ष तक्रारपेटी उघडल्यानंतर त्यात शिक्षक दत्ता होगे याच्याविरुद्ध तक्रारीच्या अनेक चिठ्या आढळून आल्या. त्यानंतर आज पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि घोरपडे, महिला पोलीस कर्मचारी शकुंतला चांदीवाले आणि पोलीस हवालदार सय्यद फय्याज यांनी विद्यार्थिनीशी संवाद साधल्यानंतर शिक्षक दत्ता होगे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.

होगे याची वादग्रस्त शिक्षक म्हणून ओळख  पालकांशी अरेरावी करणे, सहकारी शिक्षकांना त्रास देणे, धमक्या देणे  या प्रकरणामुळे शिक्षण विभागात शिक्षक दत्ता होगे कायम चर्चेत आहे. यातच आता विद्यार्थिनींना दिलेल्या त्रासामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकCrime Newsगुन्हेगारीzp schoolजिल्हा परिषद शाळा