२१ सप्टेंबरला जि.प.अध्यक्षांची निवड
By Admin | Updated: August 29, 2014 01:30 IST2014-08-29T00:52:54+5:302014-08-29T01:30:51+5:30
परभणी: जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्षांचा अडीच वर्षांचा कालावधी सप्टेंबरमध्ये संपुष्टात येणार असून नवीन अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड २१ सप्टेंबर रोजी करण्याचा निर्णय

२१ सप्टेंबरला जि.प.अध्यक्षांची निवड
परभणी: जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्षांचा अडीच वर्षांचा कालावधी सप्टेंबरमध्ये संपुष्टात येणार असून नवीन अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड २१ सप्टेंबर रोजी करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष व उपाध्यक्षांचा कालावधी सप्टेंबरमध्ये संपत आहे. नवीन अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड करण्यासंदर्भात राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाने सर्व जिल्हा परिषदांना पत्र पाठविले आहे. त्यानुसार परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्यासाठी २१ सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. पुढील महिन्यात पदाधिकारी निवडीसंदर्भातील पत्र २७ आॅगस्ट रोजी प्रशासनाला पाठविण्यात आले असले तरी याबाबत बरेच अधिकारी अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुंमरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांनाही या संदर्भातील परिपूर्ण माहिती नव्हती. जिल्हाधिकारी कार्यालयातीलही काही अधिकारी यासंदर्भात अंधारात होते. हे पत्र प्रशासनाने फारसे गांभिर्याने घेतले नसल्याने गुरुवारी या निवडणुकीसाठी अधिकारी निवडण्याची प्रक्रिया झाली नाही. आता शनिवारी किंवा सोमवारी या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्र्रतिनिधी)