जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:16 IST2021-03-07T04:16:18+5:302021-03-07T04:16:18+5:30
आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात रुजू झालेल्या शिक्षकांची पूर्वीच्या जिल्ह्यातील सेवा ग्राह्य धरावी, असे शासनाचे आदेश आहेत. आंतरजिल्हा आणि आपसी बदलीने ...

जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे धरणे आंदोलन
आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात रुजू झालेल्या शिक्षकांची पूर्वीच्या जिल्ह्यातील सेवा ग्राह्य धरावी, असे शासनाचे आदेश आहेत. आंतरजिल्हा आणि आपसी बदलीने आलेल्या शिक्षकांसाठी पूर्वीच्या जिल्ह्यातील सेवा ग्राह्य धरली जात आहे. मात्र एकतर्फी बदलीने आलेल्या शिक्षकांची पूर्वीच्या जिल्ह्यातील सेवा जेष्ठता आणि सेवा ग्राह्य धरली जात नसल्याने या शिक्षकांवर अन्याय होत आहे. तेंव्हा पूर्वीच्या जिल्ह्यातील सेवाजेष्ठता आणि सेवा ग्राह्य धरावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा बदली शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात एकतर्फी बदलीने जिल्ह्यात रुजू झालेल्या अनेक शिक्षकांनी सहभाग नोंदविला. एकतर्फी बदलीने आलेले शिक्षक राज्यभरात एकत्रित झाले आहेत. येणाऱ्या बदली धोरणात किंवा २८ जानेवारी २०१९ च्या परिपत्रकात शुद्धीपत्रक काढून बदल करावा व आमची मागणी मान्य करावी, अशी मागणी राज्य संघटनेचे संयोजक गजानन पांचाळ यांनी केले आहे.