ऑटो अपघातात युवकाचा मृत्यू

By Admin | Updated: November 6, 2014 14:33 IST2014-11-06T14:33:22+5:302014-11-06T14:33:22+5:30

केरवाडीहून येणार्‍या ऑटोरिक्षापुढे अचानक वराह समोर आल्याने झालेल्या अपघातात सतरा वर्षीय युवक ठार झाल्याची घटना ५ नोव्हेंबर रोजी रात्री १0 वाजेच्या सुमारास घडली.

Youth's death in auto accident | ऑटो अपघातात युवकाचा मृत्यू

ऑटो अपघातात युवकाचा मृत्यू

पालम : शहरात केरवाडीहून येणार्‍या ऑटोरिक्षापुढे अचानक वराह समोर आल्याने झालेल्या अपघातात सतरा वर्षीय युवक ठार झाल्याची घटना ५ नोव्हेंबर रोजी रात्री १0 वाजेच्या सुमारास घडली.
केरवाडीहून खाजगी कामानिमित्त मंगळवारी पालमकडे ऑटोरिक्षाने तिघेजण येत होते. शहरात प्रवेश करताच ऑटोरिक्षाच्या पुढे अचानक वराह आले. वराहला वाचविण्याच्या नादात ऑटोरिक्षा पलटी झाल्याने विनायक ऊर्फ बापू भाऊसाहेब एडके (वय १७, रा. केरवाडी) हा युवक गंभीर जखमी झाला. 
विनायकला नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तसेच अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. 
याप्रकरणी पालम पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पालम पोलिसठाण्याचे पोलिस करीत आहेत. /(प्रतिनिधी)

Web Title: Youth's death in auto accident