गंगाखेड येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 19:57 IST2018-08-04T19:56:18+5:302018-08-04T19:57:14+5:30

घरासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन तेवीस वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे साडे सहा वाजेपुर्वी शहरातील सर्जेराव नगर परिसरात घडली आहे.

Youth suicide takes place at Gangakhed | गंगाखेड येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

गंगाखेड येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

गंगाखेड (परभणी ) : घरासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन तेवीस वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे साडे सहा वाजेपुर्वी शहरातील सर्जेराव नगर परिसरात घडली आहे.

शहरातील दत्त मंदिर परिसरात असलेल्या सर्जेराव नगर मध्ये राहणाऱ्या गणेश रुकमाजी दाढेल वय २३ वर्ष याने घरासमोर असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार रोजी  सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. येथे राहणाऱ्या त्याच्या शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलीसांना दिल्यानंतर जमादार वसंत निळे, पोशि. मुक्तार पठाण यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला.

याप्रकरणी बालासाहेब वामनराव साळवे रा. नगर परिषदसमोर, गंगाखेड यांच्या खबरीवरून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही याचा पुढील तपास जमादार वसंतराव निळे, मुक्तार पठाण हे करीत आहेत. गणेश दाढेल यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, अडीच वर्षे वयाची मुलगी, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
 

Web Title: Youth suicide takes place at Gangakhed