विषमतेची दरी दूर करण्याचे काम युवकांनी करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:29 IST2021-02-06T04:29:26+5:302021-02-06T04:29:26+5:30
परभणी : राष्ट्रमाता जिजाऊ, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी जातीभेदाला थारा न देता प्रत्येकाला समान वागणूक दिली. त्यामुळे आजची सामाजिक ...

विषमतेची दरी दूर करण्याचे काम युवकांनी करावे
परभणी : राष्ट्रमाता जिजाऊ, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी जातीभेदाला थारा न देता प्रत्येकाला समान वागणूक दिली. त्यामुळे आजची सामाजिक विषमतेची दरी दूर करण्याचे काम युवकांनी हाती घ्यावे, असे आवाहन अहिल्यादेवी होळकर यांचे तेरावे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांनी केले.
मराठा शिवसैनिक सेना, स्वामी विवेकानंद बहुउद्देशिय प्रतिष्ठान परभणी यांच्या वतीने १ फेब्रुवारी रोजी श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष रामदास अवचार, विनायक सायकर, अशोकराव धिटे, वस्ताद अण्णा डिघोळे, ॲड.बालाजी शिंदे, किशनराव काळे, प्राचार्य प्रकाश हारगावकर, गोपाळराव मोरे, शिवाजी मोहिते, राजेंद्र गाडेकर, ॲड.ऋषिकेश शिंदे, माणिक कदम, माधव घायाळ, राजेंद्र गहाळ, आर.डी. दुधाटे, अफसर खान, सुनील अवचार, जीवन स्वामी, दीपक बोरसुरीकर, सुनील मोहिते, पी.बी. चौरे, रामप्रसाद अवचार, संकेत बोरसुरीकर आदींची उपस्थिती होती.
भूषणसिंह राजे होळकर म्हणाले, सामाजिक ऐक्याची भावना समाजातील प्रत्येक घटकामध्ये निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. रामप्रसाद अवचार यांनी सूत्रसंचालन केले. पंकज गायकवाड, वैभव जोशी, शिवाजी भोसले, रोहन गरुड, श्रीनिवास अवचार, प्रज्योत गायकवाड, विशाल गरुड आदींनी प्रयत्न केले.