पेडगाव जवळ वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:20 IST2021-09-26T04:20:31+5:302021-09-26T04:20:31+5:30
कृष्णा पांडुरंग खरवडे (२४, रा. किन्होळा (खरवडे) असे मयत युवकाचे नाव आहे. कृष्णा हा परभणीत एका खासगी दवाखान्यातील ...

पेडगाव जवळ वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू
कृष्णा पांडुरंग खरवडे (२४, रा. किन्होळा (खरवडे) असे मयत युवकाचे नाव आहे. कृष्णा हा परभणीत एका खासगी दवाखान्यातील मेडिकलवर कामास होता. २४ सप्टेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास दररोजचे काम आटोपून कृष्णा दुचाकी क्रं. (एमएच २२ एके ०८४७) वरून गावाकडे जात होता. पेडगाव फाट्याजवळ त्याच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ परभणी येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले होते. उपचार सुरू असताना शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर रात्री उशिरा त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, एक लहान भाऊ असा परिवार आहे. ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.