कुस्तीच्या स्पर्धा ठप्प पडल्याने पैलवानांची उपासमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:16 IST2021-04-16T04:16:32+5:302021-04-16T04:16:32+5:30
कोरोनाच्या संसर्गामुळे मागील वर्षभरापासून जिल्ह्यातील कुस्तीची मैदाने रिकामी आहेत. विविध देवस्थानांच्या यात्रा महोत्सवात कुस्ती स्पर्धा घेतल्या जातात. परंतु यात्राही ...

कुस्तीच्या स्पर्धा ठप्प पडल्याने पैलवानांची उपासमार
कोरोनाच्या संसर्गामुळे मागील वर्षभरापासून जिल्ह्यातील कुस्तीची मैदाने रिकामी आहेत. विविध देवस्थानांच्या यात्रा महोत्सवात कुस्ती स्पर्धा घेतल्या जातात. परंतु यात्राही बंद असल्याने कुस्ती स्पर्धांवर त्याचा परिणाम झाला आहे. यात्रा महोत्सवातील कुस्ती स्पर्धांमध्ये ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात बक्षिसे ठेवली जातात. ही बक्षिसे पटकावून पैलवान मंडळी स्वतःच्या खुराकाचा व इतर खर्चाची तजवीज करतात. मात्र, सध्या पैलवान मंडळी आर्थिक संकटात सापडली आहेत. शारीरिक सुदृढतेसाठी लागणारा खुराक आणि उदरनिर्वाहासाठी पैलवानांना सध्या संघर्ष करावा लागत आहे. तेव्हा शासनाने पैलवानांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी खासदार संजय जाधव यांच्यासह जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम, सचिव अमोल मोरे, सचिन जवंजाळ, गजानन आवरगंड, सचिन एक्केवार, गणेश थावरे, हनुमंत जवंजाळ आदींनी केली आहे.