पूर्णा येथे रेल्वे सूरक्षा बलाकडून महिला सुरक्षा जनजागृती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 04:28 PM2018-05-10T16:28:35+5:302018-05-10T16:28:35+5:30

रेल्वेस्थानक परिसर आणि रेल्वेतील प्रवासादरम्यान महिलांच्या सुरक्षेबाबत रेल्वे सुरक्षा विभागाच्यावतीने पूर्णा रेल्वेस्थानकावर जनजागृती अभियान राबविण्यात आले.

Women's safety awareness campaign launched by Railway Suraksha Balna at Purna | पूर्णा येथे रेल्वे सूरक्षा बलाकडून महिला सुरक्षा जनजागृती अभियान

पूर्णा येथे रेल्वे सूरक्षा बलाकडून महिला सुरक्षा जनजागृती अभियान

Next

पूर्णा (परभणी )  : रेल्वेस्थानक परिसर आणि रेल्वेतील प्रवासादरम्यान महिलांच्या सुरक्षेबाबत रेल्वे सुरक्षा विभागाच्यावतीने पूर्णा रेल्वेस्थानकावर बुधवारी जनजागृती अभियान राबविण्यात आले.

मागील काही दिवसांत रेल्वेस्थानक परिसर आणि रेल्वेतील प्रवासादरम्यान महिलांवर छेडछाड व अत्याचाराच्या घटनात वाढ झाली आहे. यास  रेल्वे सूरक्षा विभागाने गांभीर्य घेतले असून अशा घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी रेल्वेस्थानकावर जनजागृती अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत बुधवारी सायंकाळी पूर्णा रेल्वे स्थानकावर सूरक्षा बलाचे निरीक्षक मुकेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी स्थानकांवरील महिला प्रवास्यांना सुरक्षेच्या दृष्टीने माहिती देण्यात आली व त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला. यावेळी सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक  संजय बोरोकर, शेख जावेद आदी कर्मचारी उपस्थित होते.

हेल्पलाईन ची माहिती
प्रवासादरम्यान महिला प्रवास्यांना सुरक्षेबाबत कसलीही तक्रार असल्यास त्यांनी रेल्वे हेल्पलाईन क्रमांक १८२ वर संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. 

Web Title: Women's safety awareness campaign launched by Railway Suraksha Balna at Purna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.