आधुनिक तंत्रज्ञानातून महिला सक्षमीकरण शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:32 IST2020-12-13T04:32:01+5:302020-12-13T04:32:01+5:30
परभणी : महिला पशुवैद्यकांना परंपरागत ज्ञानासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रभावी पद्धतीने पशुचिकित्सा व रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, तसेच शासकीय ...

आधुनिक तंत्रज्ञानातून महिला सक्षमीकरण शक्य
परभणी : महिला पशुवैद्यकांना परंपरागत ज्ञानासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रभावी पद्धतीने पशुचिकित्सा व रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, तसेच शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहचविण्यासाठी महिला पशुवैद्यकांचा सहभाग मोलाचा असल्याचे मत महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे संचालक विस्तार शिक्षण प्रा. व्ही. डी. आहेर यांनी केले.
पशू वैद्यकीय महाविद्यालय परभणी व भारतीय महिला पशुवैद्यक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १६ व्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ११ डिसेंबर रोजी या परिसंवादाच्या समारोप प्रसंगी प्रा. व्ही.डी. आहेर बोलत होते. या समारोप कार्यक्रमास प्रा. डॉ. एन.व्ही. कुरकुरे, डॉ. मीनाक्षी प्रसाद, डाॅ. करुणानिधी, डॉ. मधू स्वामी, डॉ. नितीन मार्कंडेय, डॉ. दिपाली पाटील यांची उपस्थिती होती. या परिसंवादामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पशुसंवर्धनातील उपजीविका संधीची माहिती, अधिकाधिक ग्रामीण महिलांपर्यंत पोहचविणे ही आजची गरज आहे. त्या दृष्टीने महिला पशुवैद्यकाचे योगदान ही सामाजिक बदलाची नांदीच असल्याचे मत हरियाणा येथील हिसारच्या पशू जैव तंत्रज्ञान विभागाच्या प्रा. डॉ. मीनाक्षी प्रसाद यांनी यावेळी व्यक्त केले. दोन दिवस चाललेल्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. इरावती सरोदे यांनी केले. डॉ. दिपाली पाटील यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी डॉ. संजय लोंढे, डॉ. संदीप रिठ्ठे, डॉ. रुपेश वाघमारे, डॉ. गोविंद गगने यांच्यासह स्थापन केलेल्या विविध समितीच्या सदस्यांनी प्रयत्न केले.