समूहअंतर्गत महिलांनी वेगवेगळे उद्योग चालू करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:16 IST2021-02-15T04:16:20+5:302021-02-15T04:16:20+5:30

तालुक्यातील डिघोळ येथे महिलांना आर्थिक व्यवस्थापन कसे करावे, यासाठी ग्रामीण स्वयंसेवी संस्था व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती ...

Women should start different industries within the group | समूहअंतर्गत महिलांनी वेगवेगळे उद्योग चालू करावेत

समूहअंतर्गत महिलांनी वेगवेगळे उद्योग चालू करावेत

तालुक्यातील डिघोळ येथे महिलांना आर्थिक व्यवस्थापन कसे करावे, यासाठी ग्रामीण स्वयंसेवी संस्था व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी सचिन खुडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक सुनील हाट्टेकर, जिल्हा ग्रामीण स्वरोजगार संस्था संचालक पांडुरंग निनावे, मुख्य व्यवस्थापक मंगेश नवसाळकर, जिल्हा व्यवस्थापक ओमप्रकाश गलांडे, सरपंच राधाबाई शिंगाडे, उपरपंच अजय देशमुख आदींची उपस्थिती होती. पूर्वी बचत गटाला पैसे मिळत नसत मात्र आज पूर्णपणे परिस्थिती बदललेली आहे. महिलांना उत्पन्न वजा संकल्पना कळाली तर नक्कीच महाराष्ट्राचे चित्र बदलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिलांनी समूहाच्या माध्यमातून महालक्ष्मी सरस यासारख्या प्रदर्शनात हिरीरीने सहभागी व्हावे. महिलांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आपली उपजीविका जास्त कशी बळकट होईल यासाठी प्रयत्नशील असावे, असे सचिन खुडे म्हणाले. सूत्रसंचालन अरुण शिंगाडे यांनी केले. यशस्वीतेसाठी अंकुश रसाळ, प्रदीप हरणावळ, विशाल चौरे, संगीता शिंगाडे, संगीता पारेकर, सिंधू हराळे, किरण शिंगाडे, अनिता सुरवसे, मीरा हिंगे, ज्योती मोडीवाले आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Women should start different industries within the group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.